मुंबई | भाजपच्या फायरब्रँड नेत्या पंकजा मुंडे यांनी काल एक फेसबुक पोस्ट लिहिली होती. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर त्यांनी फेसबुक पोस्ट लिहून आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिलीये. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीदिनी आपण भगवानगडावर भेटू, असं त्यांनी आपल्या समर्थकांना सांगितलं आहे. 12 तारखेला त्या भाजपला सोडचिठ्ठी देऊन मोठा निर्णय घेणार असल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहेत. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खुलासा केला आहे.
स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचा जन्मदिवस 12 तारखेला असतो. त्याचा जन्मदिवस महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यंदा आम्ही सर्व भाजप नेते त्या कार्यक्रमात सामील होणार आहोत. पंकजा मुंडे भाजपमध्ये होत्या आहेत आणि असतील…. त्या भाजपशिवाय दुसरा विचारही करू शकत नाहीत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
पंकजा मुंडे यांच्या भाजपला सोडचिठ्ठी देऊन उतर पक्षात प्रवेश करण्याच्या या सगळ्या अफवा आहेत. आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
दरम्यान, पंकजा मुंडे यांनी रविवारी भावनिक पोस्ट लिहून त्या पोस्टचा शेवट भगवानगडावर भेटूयात.. मावळे येतील, अशी अपेक्षा..! अशी केली होती. त्यामुळे त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चा जोरदारपणे रंगल्या होत्या. तर आज त्यांनी त्यांच्या ट्वीटरबायोमधून भाजप हा शब्द हटवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“साहेबांच्या वाढदिवसादिवशी कार्यक्रमांची रेलचेल नको, शेतकऱ्यांना मदत करा” – https://t.co/kFjXqDvFaq @PawarSpeaks @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 2, 2019
पंकजा मुंडे राजकीय भूकंप घडवून सेनेत प्रवेश करणार?…- संजय राऊत-https://t.co/avOWN0Lx5A @Pankajamunde @rautsanjay61 @ShivSena @Dev_Fadnavis
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 2, 2019
केंद्राचे 40 हजार कोटी वाचवले हेगडे यांचा दावा शंभर टक्के खोटा- देवेंद्र फडणवीस- https://t.co/9wMo5d6W8n @Dev_Fadnavis @BJP4India @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 2, 2019