विधानसभेला चंद्रकांत पाटील ‘या’ मतदारसंघातून उतरणार निवडणुकीच्या मैदानात???

कोल्हापूर : राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटीलही यावेळी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात ताकदीने उतरताना दिसत आहेत. असं असलं तरी ते निवडणुकीच्या रिंगणात असणार की नाही याबाबत केवळ तर्कवितर्क लढवले जात आहेत.

निवडणूक लढवण्याचा कोणताही अधिकृत निर्णय जाहीर केलेला नसला तरी पाटील यांनी                    निवडणुकीसाठीच्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी लगबग सुरु केली आहे.

चंद्रकांत पाटलांसाठी 3 मतदारसंघांची चाचपणी सुरू असल्याचीही चर्चा आहे. यात कोल्हापूर उत्तर, राधानगरी आणि चंदगडची चर्चा आहे. त्यामुळं या मतदारसंघातील अन्य इच्छुकांची मात्र घालमेल वाढली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात मागील 5 वर्षात भाजपनं चांगलीच मुसंडी मारली आहे. जिल्हापरिषद महानगरपालिकांसह सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपनं आपला झेंडा फडकवला आहे.

भाजपच्या या यशात चंद्रकांत पाटलांची महत्वाची भूमिका राहिली आहे. 2014 मध्ये राज्यात सत्ता आल्यानंतर जिल्ह्यातही वर्चस्व निर्माण करणं भाजपसाठी गरजेचं होतं. त्यासाठी स्थानिक गटांची मदत घेण्याची रणनीती चंद्रकांत पाटलांनी आखली.

महत्वाच्या बातम्या-