चंद्रकांत पाटील भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार? भाजप नेते म्हणाले…

कोल्हापूर | सध्या राजकीय वर्तुळात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. नुकतंच पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीमध्ये भाजप पक्षाचा चांगलाच पराभव झाला आहे. निवडणुकीतील पराभवामुळे भाजपमध्ये अंतर्गत कलह चालल्याचं आता समोर आलं आहे.

पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची जबाबदारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर होती. मात्र, या निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे चंद्रकांत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काही भाजप नेते करत आहेत.

पक्षातीलच नेत्यांनी अशी मागणी केल्यानं आता पाटलांसमोर होम पीचवरच आवाहन उभे राहण्याची शक्यता आहे. भाजपचे जिल्हा सरचिटणीस शिवाजी बुवा आणि हातकणंगलेचे माजी तालुकाध्यक्ष पी. डी. पाटील या नेत्यांनी चंद्रकांत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.

चंद्रकांत पाटील यांच्यासोबतच भाजपचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष समरजीतराजे घाटगे यांनीही राजीनामा द्यावा, अशी  देखील मागणी या नेत्यांनी केली आहे. तसेच कोल्हापूर मधील भाजप कार्यकर्त्यांनी देखील पाटील यांच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाची निवडणूक गांभीर्याने घेतली नव्हती. यामुळेच भाजपला पराभव सहन करावा लागला आहे, असा आरोप कोल्हापूर मधील कार्यकर्त्यांनी केला आहे. यामुळे आता भाजप मधील नेत्यांच्या मागणीनंतर चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यापासून तिन्ही पक्ष संयुक्तपणे लढवत असलेली ही पहिलीच स्थानिक निवडणूक होती. यामुळे या निवडणुकीच्या निकालावर सर्वांचंच लक्ष लागून होतं.

महाविकास आघाडी बरोबरच भारतीय जनता पार्टीनेही या निवडणुकीत आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती. या निवडणुकीच्या निकालाची महाराष्ट्रातील आगामी राजकारणावर परिणाम दिसून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळवले आहे. अगदी भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या पुणे आणि नागपूर मतदार संघात देखील महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

पीएम उज्ज्वल योजनेंतर्गत 3200 रुपये भरून एक लाखाचं कर्ज मिळणार? वाचा सविस्तर

कॉंग्रेसला आणखी मोठा झटका! ‘हा’ दिग्गज नेता राजकारणातून संन्यास घेणार?

कंगनाने घेतली भाजपच्या ‘या’ मंत्र्याची भेट, काय आहे यामागे कारण?

सावधान! औषधांच्या पाकिटावरील या ‘लाल रेषे’चा अर्थ तुम्हाला माहित आहे का? वाचा सविस्तर

डॉक्टरांचा गंभीर इशारा! कोरोना लस घेतल्यानंतर ‘हे’ 5 दुष्परिणाम दिसू शकतात