“तुमच्या बोलण्यावर कोण विश्वास ठेवणार? मोदींनी ऑफर दिल्यावर…”

मुंबई | दोन वर्षापूर्वी पहाटेच्या शपथविधीवरून राज्याच्या राजकारणात एकच वादळ निर्माण झालं होतं. 48 तासांमध्ये मोठी राजकीय खेळी खेळण्यात आली होती. त्यावर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

पहाटेच्या शपथविधीत स्थापन झालेलं सरकार माझ्या आशीर्वादाने स्थापन झालं नाही, असं शरद पवार म्हणाले आहेत. मी अर्धवट काम सोडत नाही, असं म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा देखील साधला होता.

त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कोणतंही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. मात्र, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी याच मुद्द्यावर बोलताना शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शरद पवारांना सरकार स्थापन करू असं सांगितल्याचं शरद पवार म्हणतात. मग अजित पवारांनी शपथ का घेतली?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे.

मी छोटा कार्यकर्ता आहे, त्यामुळे शरद पवारांनी अजित पवारांना शपथ घेण्यासाठी पाठवलं होतं का?, असा प्रश्न देखील चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.

तुमचा इतिहास हा खरं न बोलण्याचा आहे, त्यामुळे आता तुमच्यावर विश्वास कोण ठेवणार?, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑफर दिल्यावर तुमची धावत जाण्याची इच्छा आहे. त्यामुळे  तुम्ही थांबलात का? हा मोठा प्रश्नच आहे, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी नारायण राणे यांना पाठवण्यात आलेल्या नोटीसीवर देखील भाष्य केलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

पहाटेच्या शपथविधीवर शरद पवारांचा गौप्यस्फोट, आता अजित पवार म्हणाले…

“नारायण राणेंना नोटीस देऊन बोलावणे हा तर कायदेशीर अपराध”

भारतीय जवानांना मोठं यश; जम्मू-कश्मीरमध्ये 6 दहशतवाद्यांचा खात्मा

“आम्ही मोदींचं अनुकरण करतो, ते मास्क लावत नाहीत म्हणून आम्हीही लावत नाही”

लसवंत होणारी सर्वात पहिली अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाची लागण