औरंगाबाद | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत आणि राज्यसभेत बोलताना काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्र सरकारवर देखील टीका केली.
कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी महाराष्ट्र सरकार आणि काँग्रेसने परप्रांतियांना रेल्वेमधून बसवून पाठवलं, असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. त्यानंतर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली होती.
काँग्रेस नेत्यांच्या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं होतं. त्यावेळी ट्रेन पाठवल्या होत्या तर रिकाम्या सोडायला पाहिजे होत्या, असं म्हटलं होतं.
चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यावर आता एआयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी खोचक टीका केली आहे.
कोरोना काळात ट्रेन रिकाम्या जायला हव्या होत्या म्हणणाऱ्या भाजप नेते चंद्रकांत पाटलांचा मेंदू जतन करून संग्रहालयात ठेवायला हवा, असं इम्तियाज जलील म्हणाले आहेत.
त्यामुळे किती बुद्धिमान माणसं आपल्या देशात होऊन गेली ते पुढच्या पिढ्यांना समजेल, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.
दरम्यान, इम्तियाज जलील यांच्या टीकेनंतर आता भाजप काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“10 मार्चनंतर महाराष्ट्रात भाजपचं सरकार येणार…”
“माझ्यात ठाकरे सरकारच्या ठोकशाहीला ठोकण्याची नशा”
“ही मुंबई आहे आणि मुंबईचा दादा शिवसेना आहे, इथे दादागिरी चालणार नाही”
“आम्ही तुमच्या घरात घुसलो तर तुम्हाला नागपूरलाही जाता येणार नाही”
‘महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी….’; संजय राऊतांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट