जळगाव | शिवसेनेचे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या ड्रायव्हरची एका महिलेसोबतची अश्लील ऑडिओ क्लिप असल्याचा एकनाथ दावा खडसे यांनी केला आहे. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी पलटवार केला आहे. एकनाथ खडसे यांचं मानसिक संतुलन बिघडल्याची टीका पाटील यांनी केली आहे.
एकनाथ खडसे यांचे संतुलन बिघडले आहे. खडसे यांची मुलगी मारण्याची भाषा करते. मधल्या काळात ही खडसेंनी माझ्यावर खोटेनाटे आरोप केले होते. त्यांची परिस्थिती चोरासारखी झाली आहे, अशी टीका शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
खडसेंनी एका महिलेबाबत भाषणात अपशब्द वापरला. त्यामुळे त्यांच्यावर मुंबईत कलम 509 खाली गुन्हा दाखल आहे. 30 वर्ष तुम्ही लोकप्रतिनिधी होता. पण तुमच्या सारखा खोटारडा माणूस महाराष्ट्राला लोकप्रिय झाला नाही, असा हल्लाबोलही चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसेंवर केला आहे.
खडसे यांनी एका आमदाराच्या ड्रायव्हरचे महिलेशी अश्लील संबंध असल्याची ऑडिओ क्लिप आपल्याकडे असल्याचा दावा केला होता. मुक्ताईनगर तालुक्यातील सर्व दोन नंबरचे धंदे हे आमदारांच्या समर्थकांचेच आहेत, असं एकनाथ खडसे म्हणालेत.
आम्ही याबाबत तक्रार केल्यामुळे आता पोलीस कारवाई सुरू झाल्याने त्यांचे धाबे दणाणले आहेत. यातूनच ते निरर्थक आरोप करत आहेत आपल्यावर कोणत्याही प्रकारचे गंभीर गुन्हे नसून कोण गुन्हेगारी वृत्तीचा आहे हे जनतेला माहिती आहे, असा हल्ला एकनाथ खडसेंनी लगावला होता.
यावर खडसेंचा पोलिसांवर दबाव आहे. दबावाचं राजकारण करून खोटे गुन्हे दाखल करण्याची नीती खडसे कुटुंबीयांची आहे. कोणती ऑडिओ क्लिप दाखवता? ऑडिओ क्लिपशी माझा संबंध असला तर मी आमदारकीचा राजीनामा देईल, असं आव्हान चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसेंना दिलं आहे.
दरम्यान, महिलांवर कोणी अत्याचार करत असेल तर मी खपवून घेणार नाही. तसेच मी त्यांना चोप दिल्याशिवाय राहणार नाही. तसेच आमदारांनी हे प्रकरण गंभीरतेनं घ्यावं, असं रोहिणी खडसे म्हणाल्यात.
महत्वाच्या बातम्या-
रणबीर कपूर हा अजिबात सेक्सी मुलगा नाही, तो आईच्या…- सोनम कपूर
पंतप्रधान नरेंद्र मोदींची 2021 मधील शेवटची ‘मन की बात’; काय बोलणार याकडे देशाचं लक्ष
एलआयसीची भन्नाट योजना; 1 रुपयाच्या गुंतवणुकीतून मिळवा कोट्यवधीचा फायदा
‘…तर परिस्थिती चिंताजनक होईल’; आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी व्यक्त केली ‘ही’ भीती
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या निर्णयाचं मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, म्हणाले…