“झोपेत देखील दिलेला शब्द पाळण्याची सवय मला आई-वडिलांनी लावली”

कोल्हापूर | राज्याच्या सार्वजनिक प्रवासी वाहतुकीचा कणा असणारी एसटी सध्या संपाच्या गर्तेत अडकली आहे. अशात या संपामुळं राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार वाद रंगला आहे.

ठाकरे सरकारनं एसटी महामंडळाचं विलीनीकरण करावं यासाठी राज्यभरातील एसटी कर्मचारी गेल्या तीन महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. अशात आता काही भागात एसटी सुरू झाली आहे.

एसटी पुर्णपणे सुरू होण्यासाठी सर्व कर्मचारी कामावर हजर होणं गरजेचं आहे. अशात कर्मचारी विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून मागं हटायला तयार नाहीत. परिणामी भाजपनं सत्ताधारी महाविकास आघाडीवर टीका केली आहे.

अनेक आगारात आणि एसटी विभागात कर्मचारी अजूनही संपावर आहेत. अशात कोल्हापूर येथील संपकरी कर्मचाऱ्यांची भेट घेण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तिथं गेले होते.

संपकरी कर्मचाऱ्यांच्या भेटीनंतर पाटील यांच्या तेथील संभाषणाची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. एसटी कामगारांच्या पाठीशी भाजप खंबीरपणे उभा आहे, असं पाटील म्हणाले आहेत.

झोपेत देखील दिलेला शब्द पाळण्याची सवय माझ्या आई-वडिलांनी मला लावली आहे, असं पाटील म्हणाले आहेत. पाटील यांचं हे वक्तव्य सध्या सर्वत्र चर्चेत आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटेपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांची चूल पेटवण्याची जबाबदारी भारतीय जनता पार्टीची आहे, अशी मी घोषणा करतो, असं पाटील म्हणाले आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांचा विलीनीकरणाचा प्रश्न सध्या न्यायप्रविष्ठ आहे. अशात आता हा संप मिटवण्यासाठी सरकार सर्व प्रयत्न करत असताना पाटील यांच्या या वक्तव्यानं राज्यात वाद निर्माण होवू शकतो.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांची गनना राज्यातील दिलखुलास नेत्यांमध्ये केली जाते. पाटील हे कधीही कसल्याही राजकीय परिणामांची चिंता न करता आपलं बेधडक वक्तव्य करण्यात माहिर आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

 IPL 2022 Mega Auction: ‘या’ 5 खेळाडूंवर लागू शकते सर्वाधिक बोली

किंग कोहलीचा उत्तराधिकारी कोण??? ‘या’ खेळाडूच्या नावाची होऊ शकते लवकरच घोषणा

‘माझ्या नादी लागाल तर करील 302’; पिंपरीतील तरुणीची सोशल मीडियावर भाईगिरी 

“गंगेत वाहून गेलेले मृतदेह योगींना मतं द्यायला येणार आहेत का?” 

‘…तर पुण्यात बसने प्रवास करता येणार नाही’; महापालिकेनं घेतला हा मोठा निर्णय