मुंबई | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका करताना खळबळजनक दावा केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
ठाकरे सरकारमधील 10 मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. विधिमंडळात माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.
सध्या माजी ऊर्जामंत्र्यांना अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे की त्यांच्या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये जी काही कामं झालं, त्यांची चौकशी करा. तुमचं सरकार येऊन 28 महिने झाले. तुम्ही फक्त धमक्याच देत आहात, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत.
मोदींनी सांगितलंय की ना खाऊंगा, ना खाने दूंगा. त्यामुळे काही सुपात आहेत आणि काही जात्यात आहेत. सुपात आहेत ते जात्यात जाणार आहेत. त्यामुळे सगळ्यांचं पीठ होणार हे नक्की. जसजशी नावं समोर येतील, तसतशा कारवाया होतील, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
आमचा कुणी दोषी असेल, तर तो गुन्ह्यात दोषी ठरेल, आम्ही घाबरत नाही. तुम्ही उत्तर द्या, 20 दिवस झाले, एक कॅबिनेट मंत्री जेलमध्ये असतो आणि तुम्ही त्याचा राजीनामा घेत नाहीत, असं त्यांनी म्हटलंय.
सरकारी नोकराला अटक झाली, की 24 तासांत निलंबित करावं लागतं असा नियम आहे. तुम्ही त्याच्या वर जात आहात का?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
Russia-Ukraine War: मोठी बातमी! रशियाकडे आता फक्त 14 दिवसांचा…
महाराष्ट्राचे माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचं निधन!
“ज्यांना वाटतं की ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट योग्य नाही त्यांनी…”
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी; ही महत्त्वाची माहिती आली समोर
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; विधानसभा अध्यक्षपदाबाबत महत्त्वाची माहिती समोर