“कार्यकर्त्यांनो काळजी करू नका, 10 मार्चनंतर महाराष्ट्रात भाजपचं सरकार येणारे”

मुंबई | देशाचे उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक खळबळजनक पत्र लिहिलं आहे. या पत्रावरून आता देशाच्या राजकारणात जोरदार वाद पेटला आहे.

संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देखील भाजपवर आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर जोरदार टीका केली आहे. परिणामी आता राज्यात महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये वाद रंगला आहे.

महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून राज्य सरकारला आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना केंद्रीय तपास यंत्रणा त्रास देण्याचं काम करत आहेत, असा आरोप राऊत यांना केला आहे.

दिल्लीत राऊत यांच्या वक्तव्यावरून वातावरण तापलेलं असताना आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारला घेरण्याचं काम केलं आहे.

राज्य सरकार सत्तेचा दुरूपयोग करत आहे. पुण्यात सोमय्या यांच्यावर जो हल्ला झाला तो दुर्देवी होता. सोमय्यांना मी म्हटलं 10 मार्चला उत्तर प्रदेश निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सरकार येणार आहे.

10 मार्चनंतर महाराष्ट्रात सरकार बदल होणार आहे परिणामी कार्यकर्त्यांनी काळजी करू नये, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आपण हे वक्तव्य केल्याचं पाटील म्हणाले आहेत.

चंद्रकांत पाटील यांनीपूर्वीही अनेकदा महाविकास आघाडी सरकार जाणार अशी वक्तव्य केली आहेत. परिणामी पाटील यांचं हे वक्तव्य हे अगदी यापूर्वी केलेल्या वक्तव्यासारखं आहे की गंभीर आहे अशी चर्चा राज्यात आहे.

दरम्यान, संजय राऊत यांनी नायडू यांना पत्र लिहून केलेल्या गंभीर आरोपांवरून राज्यात राजकारण पेटलं आहे. ईडी, सीबीआय, या केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारला त्रास देण्यात येत असल्याचा खबळजनक आरोप राऊत यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 “माझ्यात ठाकरे सरकारच्या ठोकशाहीला ठोकण्याची नशा”

“ही मुंबई आहे आणि मुंबईचा दादा शिवसेना आहे, इथे दादागिरी चालणार नाही” 

“आम्ही तुमच्या घरात घुसलो तर तुम्हाला नागपूरलाही जाता येणार नाही” 

‘महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी….’; संजय राऊतांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

कोरोनामुक्त झालेल्यांना ‘या’ आजाराचा धोका, अत्यंत धक्कादायक माहिती समोर