Top news महाराष्ट्र मुंबई राजकारण

“महाविकास आघाडीचं डोकं ठिकाणावर आहे का?”

mahavikas aghadi
Photo courtesy - facebook / uddhav thackarey, sharad pawar, nana patole

मुंबई | महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये सध्या विविध मुद्द्यावरून जोरदार वाद रंगला आहे. भाजपचे प्रदेशध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर कोरोना नियमावलीवरून जोरदार टीका केली आहे.

राज्यातील वाढत्या कोरोना रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सरकारनं राज्यभरात विविध क्षेत्रात निर्बंध लागू करण्याची घोषणा केली आहे. परिणामी यावरूनच राज्यात राजकारण पेटलं आहे.

राज्यात सध्या महाविकास आघाडी विनाकारण निर्बंध लावत आहे. राज्यातील नागरिकांना त्रास देण्याचं काम कोरोनाच्या नावाखाली सरकारनं चालवलेलं आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

नावापुरताच महाविकास असणारे हे सरकार प्रत्यक्षात मात्र महाविरोधाभास सरकार आहे. दोन वर्षांपासून ठप्प असलेले जनजीवन आता सुरळीत होत होते. त्यावर निर्बंध लावू नयेत असे राज्यातील जनता ओरडून ओरडून सांगत होती, परंतु या सरकारने आपला मनमानी कारभार राबवत विरोधाभासी प्रतिबंध लादले आहेत, असं पाटील म्हणाले आहेत.

ठाकरे सरकार जनता झोपलेली असताना संचारबंदी लावते, पण दिवसा लोकल्स, बसेस तुडुंब गर्दी भरून वाहत असतात. मॉल्स, रेस्टॉरंट्स, बार, ऑफिसेस अशा वातानुकूलित जागांना परवानगी मिळते, परंतु शारीरिक व मानसिक विकासासाठी आवश्यक असणाऱ्या विद्यालये, क्रीडांगणे इ. जागांवर मात्र प्रतिबंध लादले जातात, अशी टीका पाटील यांनी केली आहे.

राज्यातील सर्वसामान्य जनतेला या सरकारमधील गोंधळाचा नाहक त्रास भोगावा लागत आहे. राज्यभर नागरिकांना कोरोनाच्या नावाखाली निर्बंधांना सामोरं जावं लागत आहे, असंही पाटील म्हणाले आहेत.

नागरिकांना त्रास होत असताना सरकार मात्र कुंभकर्णाची झोप घेत असून सर्वसामान्यांचा आवाज त्यांच्या कानी पोहोचलाच नाही. या महाविकास आघाडी सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?, हा प्रश्न आज उभा महाराष्ट्र विचारत आहे, अशी टीका पाटील यांनी केली आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या या जहरी टीकेनंतर राज्यातील राजकारण तापण्याची चिन्ह आहेत. राज्यात सध्या कोरोनाची परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. असं असताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वाद रंगला आहे.

दरम्यान, राज्यातील बार आणि हाॅटेल्स उघडे ठेवून सरकारनं शाळा बंद केल्यानं सरकारला जोरदार टीकेचा सामना करावा लागत आहे. अशात आता पाटील यांच्या टीकेला सरकारकडून काय उत्तर येतं हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

 भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी राष्ट्रवादी मैदानात; केल्या ‘या’ मोठ्या घोषणा

 “शरद पवारांची कुणाला अ‍ॅलर्जी असण्याचं काम नाही”

मोठी बातमी! लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण, ICU मध्ये दाखल 

मोठी बातमी! रेस्टॉरन्ट, बार, खासगी कार्यालये आजपासून बंद

“अभिनंदन, राज्याचा महसूल घटवून तुम्ही शरद पवारांना चर्चा करायला भाग पाडलंत”