“सरकार ड्राय डे ला सुपर मार्केट आणि किराणा दुकान बंद ठेवणार का?”

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तब्येतीच्या कारणानं गेल्या दोन महिन्यांपासून सार्वजनिक कार्यक्रमांपासून लांब होते. अशात आता ठाकरे सक्रिय झाले आहेत.

उद्धव ठाकरे सक्रिय झाल्यानंतर राज्य सरकारच्या पहिल्याच निर्णयानं राज्यात खळबळ माजली आहे. सरकारवर विरोधी पक्ष भाजप जोरदार टीका करत आहे.

राज्यातील सुपर मार्केट आणि किराणा दुकानांमध्ये वाईन विकायला सरकारनं परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी राज्यात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.

राज्य सरकारनं सरकारी महसूलातील तुट भरूण काढण्यासाठी आणि राज्यातील द्राक्षं बागायतदार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी वाईन उत्पादन अन् विक्रीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारनं वाईन विक्रीला चक्क सुपर मार्केट आणि किराणा दुकानावर विक्रीची परवानगी दिल्यानंतर राज्य सरकारवर जोरदार टीका होत आहे. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.

ड्राय डे ला किराणा दुकान आणि सुपर मार्केट बंद ठेवणार का?, असा सवाल बावनकुळे यांनी सरकारला केला आहे. परिणामी भाजप आणि सरकारमध्ये जोरदार शाब्दिक वाद रंगला आहे.

नशेडी महाविकास आघाडी सरकारने ड्राय डेबद्दलही उत्तर जनतेला द्यावे. आता एवढेच सांगायचे आणि करायचे शिल्लक राहिले आहे, अशी टीका बावनकुळे यांनी केली आहे.

राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेच गुरूवारी या निर्णयाची घोषणा केली होती. त्यानंतरपासून भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जोरदार वाद पेटला आहे.

दरम्यान, महाराष्ट्र हे आघाडीचे द्राक्षं उत्पादक राज्य आहे. पण राज्यात तितक्या प्रमाणात वाईनचं उत्पादन होत नाही. परिणामी सरकारनं आता वाईन उत्पादनास प्रोत्साहन द्यावं असा सूर निघत आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

अखेर समंथा नागा चैतन्यच्या घटस्फोटावर नागार्जुनने सोडलं मौन, म्हणाला “समंथाला…”

महाराष्ट्राच्या चित्ररथावरून वाद, सोशल मीडियावर नाराजीचा सूर

पदोन्नती आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय!

12 आमदारांचं निलंबन रद्द! देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

BREAKING: ठाकरे सरकारला मोठा धक्का, 12 आमदारांचं निलंबन अखेर रद्द