नागपूर | मला विधानसभेचं आणि विधान परिषदेचं तिकीट नाकारल्यावर मी पक्षाला कधीच विचारलं नाही की मला तिकीट का नाकारलं. शेवटी पक्ष एखादा निर्णय घेत असतो. कदाचित पक्षाला माझी विधान मंडळात उपयुक्तता वाटली नसेल, म्हणून मला तिकीट दिलं नसेल, असं भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.
मला विधान परिषदेची उमेदवारी मिळेल, अशी चर्चा होती. मी टीव्हीवरून ती चर्चा ऐकत होतो. मात्र पक्षाला मी उमेदवारी मागितली नव्हती. मी गेली 28 वर्ष पक्षात काम करतोय. पक्षाने मला काम करायला अनेक रोल दिले आहेत. 3 वेळा आमदार झालो… मंत्री झालो… आता पक्षा देईल ते काम मी करेल. पक्षाचा निर्णय मला मान्य आहे. मी अजिबात नाराज नाही, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
विधानपरिषदेची उमेदवार जाहीर झाल्यानंतर पक्षाच्या कोणीही नेत्याने माझ्याशी संपर्क केलेला नाहीये. काल मी टीव्हीवर ऐकलं की चंद्रकांत पाटील म्हणाले, चंद्रशेखर बानकुळे हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या उमेदवारीची शिफारस आम्ही केंद्रिय बोर्डाला केली होती. मात्र त्यांना तिकीट का नाकारलं हे आम्हाला देखील माहिती नाही. त्यांच्यावर एकप्रकारे अन्यायच झाला, असं बावनकुळे यांनी सांगितलं.
राजकीय प्रवासात अनेक चढउतार पाहावे लागतात. शेवटी एक दोन घटनांच्या आधार ठरवता येत नाही की आपल्यावर अन्याय होतोय. मी पक्षाची वाट पाहणार आहे. त्यांना ज्यावेळी वाटेल की माझी उपयुक्तता आता आहे त्यावेळी माझ्याबाबत ते विचार करतील, असंही सांगायला बावनकुळे विसरले नाहीत.
महत्वाच्या बातम्या-
-पायी जाणार्या मजुरांना पाणी, जेवण उपलब्ध करून द्या; आंबेडकरांचं कार्यकर्त्यांना आवाहन
-…म्हणून रणजितसिंह मोहितेंना तिकीट दिलं; चंद्रकांत पाटलांनी सांगितलं कारण
-“२ दिवसात पंकजा मुंडेंनी चांगला अभ्यास केला, मला आणि इतरांना तो जमला नाही”
-…त्यासाठी दहशत निर्माण करणाऱ्या ईडी, सीबीआयसारख्या राजकीय संस्थांचे लॉकडाऊन करा- संजय राऊत
-कदाचित कोरोना विषाणू कधीच संपणार नाही; जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली भिती