मुंबई | राज्यातील सत्तानाट्यानंतर एकदाचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. यावेळी शिवसेनेतून बंडखोरी करुन गेलेल्या नऊ आणि भाजपच्या नऊ आमदारांना मंत्रिपदे मिळाली होती.
पण त्यांच्या मंत्रिमंडळ विस्ताराला आणि खातेवाटपाला अवकाश लोटूनही त्यांनी मंत्रालयात येऊन आपला कार्यभार स्वीकारला नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाष्य केले आहे.
राज्यातील अर्ध्याहून अधिक मंत्र्यांनी पितृपक्ष असल्याने अद्याप मंत्रालयातील दालनात कार्यभार स्वीकारला नाही, असे कळते. परंतु जग कुठे चालले आहे आणि यांचा पितृपक्षामुळे कारभार अडला आहे, असे अजित पवार म्हणाले.
अजित पवार यांच्या टीकेला भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bhawankule) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांचा मुख्यमंत्री 18 महिने मंत्रालयात आला नाही, असे बावनकुळे म्हणाले.
महाविकास आघाडीने स्वत:च्या चुका पाहाव्यात, असा सल्ला देखील बावनकुळे यांनी यावेळी अजित पवार आणि विरोधी पक्षांना दिला. आमच्या सर्व मंत्र्यांनी त्यांच्या विभागाचे कामकाज स्वीकारले आहे, असे बावनकुळे म्हणाले.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्याचा मुख्यमंत्री 18 महिने फक्त फेसबूक लाईव्ह करतो, 18 महिने मंत्रालयात येत नाही. पालकमत्री म्हणून ज्यांची निवड केली आहे, ते आपल्या मतदारसंघाचे पालकमंत्री झाले होते, असे बावनकुळे म्हणाले.
18 महिने मंत्रालयाचे तोंड न पाहिलेल्या सरकारने आणि आताच्या विरोधी पक्षाने आम्हाला जाब विचारण्याचा त्यांना अधिकार नाही तसेच विरोधकांच्या 90% टीका या माध्यमांमध्ये बातम्या करण्यासाठी असतात, असे बावनकुळे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या –
“नरेंद्र मोदींनंतर भाजप सोनिया गांधी यांना…”; अरविंद केजरीवाल यांचा मोठा दावा
मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; शिर्डी संस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त
“…तर हा आशिष शेलार सुद्धा कुरेशी”; आशिष शेलारांचा व्हिडिओ व्हायरल
“…म्हणून मी भगवान गडावर दसरा मेळावा घेणार आहे”; करुणा मुंडे यांचा मोठा दावा
गोळीबार प्रकरणी सदा सरवणकरांवर दादर पोलिसांची मोठी कारवाई