आता भुजबळ कुठं आहेत… त्यांची बोलती बंद झाली; चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल

मोझरी (अमरावती) |  भाजपची आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन ‘महाजनादेश’ यात्रा सुरू झाली आहे. अमरावतीतल्या मोझरी गावातून या यात्रेची सुरूवात झाली आहे. या यात्रेच्या निमित्ताने चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या भाषणात त्यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

छगन भुजबळ यांनी आवई उठवली होती की हे राज्य सरकार ओबीसी आरक्षणाला धक्का लावून मराठा आरक्षण देणार आहे. पण स्वतंत्रपणे आरक्षण देऊन त्यांचा डाव आणि त्यापाठीमागचं राजकारण मुख्यमंत्र्यांनी हाणून पाडलं. आता भुजबऴ कुठं आहेत… त्यांची बोलती बंद झाली, असा हल्लाबोल पाटील यांनी केला.

आघाडी सरकारला मराठा आरक्षण द्यायचंच नव्हतं… त्यांची ती मानसिकताच नव्हती… मराठ्यांची मुलं शिकली नाही पाहिजेत, असं त्यांना वाटतं होतं… म्हणूनच गेली कित्येक वर्ष आघाडी सरकारने हा प्रश्न प्रलंबित ठेवला, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी आघाडीवर केला.

महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने दमदार कामगिरी केली आहे. त्याच्याच हिसाब- किताब जनतेला देण्यासाठी निघालो आहेत, असं ते म्हणाले.

आघाडीच्या नेत्यांच्या पक्षांतरानंतर सगळे आम्हाला म्हणतात की आता ‘अब की बार 250 पार… !’ पण आम्ही त्यांना म्हणतो जर एवढं झालं तर विरोधी पक्ष सक्षम राहणार नाही. त्यासाठी ‘अब की पार 220 पार’… याने विरोधी पक्ष सक्षम राहिल, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

दरम्यान, जनतेनं ठरवलंय… पुन्हा एकदा विकासाच्या झंझावाताला निवडून द्यायचं. आम्हाला लोकांनी पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी द्यावी, असं आवाहन देखील त्यांनी उपस्थितांना दिलं.

महत्वाच्या बातम्या-

-जितेंद्र आव्हाडांच्या बोचऱ्या टीकेला शिवेंद्रराजेंचं खरमरीत प्रत्युत्तर!

-“शरद पवार हृदयात आहेत असं म्हणणाऱ्यांचं हृदय मला चेक करावं लागेल”

-शरद पवारांनी माझं सरकार पाडलं, सर्वांना त्रास दिल्यानेच आज त्यांची अवस्था अशी!

-नेते सोडून गेले म्हणून राष्ट्रवादीने फोडले फटाके!

-ज्युनिअर आर. आर. पाटील म्हणतात; वेळ बदलते म्हणून ‘घड्याळ’ थांबत नाही…!