“…मग पार्थ पवारांना बारामतीमधून उमेदवारी का दिली नाही?”

सातारा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जर त्यांचे नातू पार्थ पवार यांनी निवडणून यावं अशी इच्छा होती. तर त्यांनी पार्थ यांना बारामती मधून उमेदवारी का दिली नाही?, असा सवाल महसूल मंत्री चंद्रकात पाटील यांनी केली आहे. ते महाबळेश्वरमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. 

शरद पवारांना त्यांच्या पक्षात त्यांंचीच घराणेशाही वाढवायची आहे. म्हणून त्यांनी बारामतीमधून त्यांची मुलगी सुप्रिया सुळे यांना उमेदवारी दिली, असा आरोप चंद्रकांत पाटलांनी केला आहे. 

शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांना पक्षातील माणसे जपता येत नाही आणि ते भाजपवर आरोप करतात, अशीही टीका त्यांनी केली आहे. 

‘नाचता येईना आंगण वाकडे’ अशी अवस्था काँग्रेस नेत्यांची झाली आहे. निवडून येता नाही म्हणून ईव्हीएमवर खापर फोडतात, असा आरोप पाटलांनी काँग्रेसवर केला आहे.

आम्ही जर ईव्हीएम घोटाळा केला असता तर आम्ही बारामतीमध्येही निवडून आलो असतो, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी काँग्रेस-राष्ट्रावादीला धारेवर धरलं आहे.