“कलंकित अधिकाऱ्याला पाठीशी घालून ठाकरे मुख्यमंत्री पदाची आणि राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळवत आहेत”

पुणे | मनसुख हिरेन प्रकरणामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. याप्रकरणी एपीआय सचिन वांझे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. सचिन वांझे यांनीच आपल्या पतीची ह.त्त्या केली असल्याचा आरोप मनसुख हिरेन यांच्या पत्नीने केला आहे. नुकतंच याप्रकरणी सचिन वांझे यांना अ.टक झाली आहे.

सचिन वांझे यांना अ.टक होताच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आ.रोप केले आहेत. मुख्यमंत्री राज्याची प्रतिष्ठा धुळीत मिळवत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. सचिन वांझेंच्या अ.टकेनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, एनआयएने द.हशतवादी कटात अ.टक केलेल्या पोलीस अधिकाऱ्याला राज्याचे मुख्यमंत्री पाठीशी घालत होते. एका कलंकित अधिकाऱ्याला पाठीशी घालून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची आणि राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळवत आहेत.

उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिक सचिन वांझे यांचा बचाव का केला, हे समजण्यापलीकडे आहे. लोकशाही व्यवस्थेत कोणताही पक्ष प्रथम आपल्या संविधानाशी निष्ठा बाळगतो आणि नंतर जनतेचा पाठिंबा मिळवतो. मात्र, येथे उद्योगपतींच्या घा.तपाताची व समाजातील शांतता भं.ग करणाऱ्यांचे शिवसेना समर्थन करत आहे, असे गंभीर आ.रोप पाटील यांनी केले आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फो.टकांनी भरलेली गाडी मिळाली होती. सध्या एनआयएकडून या जिलेटीन गाडीचा देखील त.पास केला जात आहे. ही स्कॉर्पिओ मनसुख हिरेन यांच्या नावावर होती. यानंतर काही दिवसांनी हिरेन यांचा संशयास्पद मृ.त्यू झाला.

मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृ.तदेह सापडल्याने राज्यात खळबळ उडाली होती. या घटनेनंतर राज्यात राजकीय वातावरण देखील चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षांमध्ये या प्रकरणावरून आ.रोप-प्रत्यारोपांची खेळी चांगलीच रंगलेली दिसत आहे.

मनसुख हिरेन यांच्या मृ.त्यूनंतर राज्यातील अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. याप्रकरणी सचिन वांझे संशयित आरोपी असताना राज्य सरकार त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेत्यांनी राज्य सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

महेंद्रसिंग धोनीने सांसारिक मोह मायेपासून संन्यास घेतला? फोटो व्हायरल

….म्हणून या बड्या अभिनेत्रीने भर स्टेजवर कपडे काढले; कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!

‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा’; भाजपच्या ‘या’ नेत्यानं केली मागणी

…अन् शिल्पाने सेटवरच त्याच्या कानशिलात वाजवली; पाहा व्हिडिओ