मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा सुरु आहे. यात्रेदरम्यान त्यांना मुख्यमंत्रिपदाबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाचं त्यांनी उत्तर दिलं आहे.
भाजपमध्ये कोणीही कार्यकर्ता सांगितलेली जबाबदारी पार पाडतो. भाजपचे प्रदेशाध्यक्षही पक्षाने मुख्यमंत्रिपदाची दिलेली जबाबदारी पार पाडतील, असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी चंद्रकांत पाटलांना पत्रकारांची गुगली कळत नसल्याचं सांगितलं.
पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडेल असं प्रत्येक कार्यकर्ता म्हणतो चंद्रकांत पाटीलही असंच बोलले असतील. ते खूप साधे आहेत. त्यांना पत्रकारांच्या गुगली कळत नाहीत, असं म्हणत त्यांनी चंद्रकांत पाटलांच्या मुख्यमंत्रिपदाबाबतच्या वक्तव्यावर भाष्य केलं आहे.
चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष म्हणून उत्तम कामगिरी पार पाडतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
दरम्यान, मुंबईत भाजपची ताकद वाढली आहे. स्वबळावर लढलो तरीही भाजपच जिंकेल, असाही विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-विधानसभा निवडणूक लढवणार का??? अशोक चव्हाण म्हणतात…
-बीडचं रुप झपाट्यानं बदलणार; जयदत्त क्षीरसागरांचा विश्वास
-“राज ठाकरेंना कोणताच उद्योगधंदा नाही”
-“राष्ट्रवादीला लागलेल्या गळतीमुळे शरद पवार जखमी”
-“काट्याने काटा काढायला आम्ही काय मेलेल्या आईचं दुध पिलंय का?”