‘चांद्रयान-2’चा चंद्राच्या कक्षेत यशस्वी प्रवेश

बंगळुरू : श्रीहरिकोटातील प्रक्षेपणाच्या29 दिवसांनंतर ‘चांद्रयान-2’ने मंगळवार सकाळी 9:30 वाजता चंद्राच्या कक्षेत यशस्वीपणे प्रवेश केला. यानंतर 7 सप्टेंबरला ‘चांद्रयान-2’ चंद्रावर पोहोचेल. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे प्रमुख के. सिवन पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देतील. ‘चांद्रयान-2’वर लावण्यात आलेल्या दोन मोटरींना सक्रीय करण्यात आल्यानंतर या स्पेसक्राफ्टनं चंद्राच्या कक्षेत सहज प्रवेश केला.

मंगळवारी सकाळी 8:30 ते 9:30 वाजल्याच्या दरम्यान ‘चांद्रयान-2’च्या तरल रॉकेट इंजिन सोडून हे यान चंद्राच्या कक्षेत दाखल करण्याची मोहिम फत्ते करण्यात आली. चंद्राच्या कक्षेत प्रवेश करताना ‘चांद्रयान-2’ला कठोर आव्हानांना तोंड द्यावं लागलं. त्यामुळे आज सर्वांचच लक्ष चांद्रयान-2 कडे लागलेलं आहे. चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर हे यान 31 ऑगस्टपर्यंत चंद्राभोवती फिरत राहणार आहे. त्यानंतर 7 सप्टेंबरला चांद्रयान-2 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे.

आता ‘चांद्रयान-2’ हे 188 किलोमीटर एपोजी आणि 18078 किलोमीटरच्या पेरीजी अंडाकृती कक्षेत 24 तास प्रदक्षिणा घालणार आहे. यादरम्यान ‘चांद्रयान-2’चा वेग 10.98 किमी प्रतिसेकंदवरून कमी करून 1.98 किमी प्रतिसेकंद करण्यात येणार आहे. ‘चांद्रयान-2’चा वेग 90 टक्क्यांनी कमी केला आहे. चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या प्रभावामुळं अनियंत्रित होऊन धडकू नये यासाठी चांद्रयान-2 चा वेग कमी करण्यात आला आहे.

चंद्राच्या कक्षेत दाखल झाल्यानंतर चांद्रयान-2 इस्रो स्पेसक्राफ्टच्या दिशेत चार वेळा परिवर्तन करणार आहे. 21, 28, 30 ऑगस्ट तसंच 1 सप्टेंबर रोजी ह्या दिशा परिवर्तन करण्यात येतील. 

चंद्राच्या ध्रुवाहून प्रवास करत जवळपास 100 किलोमीटरच्या अंतरावर चांद्रयान-2 आपल्या अंतिम कक्षेत दाखल होईल. यानंतर विक्राम लँडर 2 सप्टेंबर रोजी चांद्रयान-2 हून विलग होऊन चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्यात येईल. 

महत्वाच्या बातम्या-

-स्वाभिमानी कोल्हापूरकरांना कोणाच्या भीकेची गरज नाही; संभाजीराजेंचा विनोद तावडेंवर निशाणा

-“महाराष्ट्र काँग्रेस-राष्ट्रवादी मुक्त करण्याची भाषा करणारं भाजप स्वतःच राष्ट्रवादी’युक्त’ झालंय”

-मनसेची आज बैठक; ईडीविरोधात आंदोलनाच्या तयारीत!

-“…त्यांना 10 दिवसांपूर्वीच सांगितलं होतं, राज ठाकरेंना वाचवा”

-मुख्यमंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा फडणवीसांवर आरोप; कठोर कारवाईची मागणी