इंदुरीकरांच्या वक्तव्याने आयुर्वेदाच्या अभ्यासक्रमात बदल करण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे संकेत

उस्मानाबाद | प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते, असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याच मुद्याला अनुसरून आयुर्वेद अभ्यासक्रमात बदल करण्याचे संकेत राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. ते उस्मानाबादमध्ये पत्रकारांशी बोलत होते

आयुर्वेदाचा अभ्यासक्रम हा प्राचीन काळापासून शिकवला जात आहे. आता काळ बदलला असून ते संदर्भ अभ्यासक्रमात गरजेचे आहेत का? हे आयुर्वेदिक संचालनालय तपासेल आणि आवश्यक तसे बदल केले जातील, असं अमित देशमुख यांनी सांगितलं आहे.

कीर्तनकार इंदोरीकर यांनी अष्टांगहृदयम व सुश्रुत संहिता ग्रंथाचा आधार घेत वक्तव्य केलं होतं. आणि त्याच ग्रंथाचा आयुर्वेद अभ्यासक्रमात सम आणि विषम फॉर्म्युला शिकवला जात असल्याचा संदर्भ अनेक कीर्तनकार आणि आयुर्वेदचार्य यांनी इंदोरीकरांच्या समर्थनार्थ दिला होता.

दरम्यान, आता इंदुरीकरांच्या वक्तव्यानंतर खरंच आयुर्वेद अभ्यासक्रमात बदल होतो का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-बरळणाऱ्या वारिस पठाणांच्या मदतीला धावले इम्तियाज जलील; म्हणाले…

-नीरेचं पाणी पेटलं… बारामतीला पाणी वळवल्याच्या निषेधार्थ आज फलटण बंद

-“15 कोटी मुसलमान जर तुमच्या विचारांचे असते तर तुमच्यावर माजी आमदार होण्याची वेळ आली नसती”

-बाळासाहेब असते तर ते काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर गेले असते का?? सुभाष देसाईंचं लक्षवेधी उत्तर

-ठाकरे सरकारचा रिमोट कंट्रोल तुमच्या हातात आहे काय? शरद पवार म्हणतात…