शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; PM Kisan योजनेत झाला मोठा बदल

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींची सर्वाधिक महत्त्वाकांक्षी योजना म्हणून PM Kisan योजना देशभर राबवली जात आहे. सातत्यानं या योजनेत बदल करण्यात येत आहेत.

प्रत्येक राज्यात आणि जिल्ह्यात या योजनेचे लाभार्थी आहेत. परिणामी केंद्र सरकारनं पती-पत्नी यांच्या लाभाबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

एकाच कुटुंबातील पती-पत्नी या दोघांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळत असेल तर दोघांपैकी एकाला आतापर्यंत मिळालेली रक्कम परत करावी लागणार आहे.

आतापर्यंत या योजनेत तब्बल 8 बदल करण्यात आलेले आहेत. ई-केवायसी हा त्यातील महत्त्वाचा बदल आहे. त्यानंतर आता पती-पत्नीच्या लाभाबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

आयकर भरण्यास पात्र असणाऱ्यांनी आणि पती-पत्नी यांनी लाभ घेतल्याचं लक्षात आलं आहे. परिणामी सरकारनं कारवाई करण्यास सुरूवात केली.

11 वा हफ्ता मिळण्याच्या पार्श्वभूमिवर सरकार फसवणूक करून लाभ मिळवणाऱ्यांवर कारवाई करणार आहे. नोटीस पाठवायला सरकारनं सुरूवात केली आहे.

कित्येक ठिकाणी शेतकऱ्यांना तुरूंगात जाण्याची वेळ आली आहे. तुरूंगात जायचं नसेल तर पैसे परत करा अशाप्रकारची नोटीस सरकारकडून देण्यात येत आहे.

दरम्यान, लोकाभिमूख योजना सदोषपणे नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा मानस असल्याची भावना केंद्र सरकारनं व्यक्त केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 ‘8 वर्ष देश चालवल्यानंतर पंतप्रधानांना…’; केजरीवालांनी भाजपला झाप झाप झापलं

 “कोल्हापूरच्या रूग्णालयात मला मारून टाकण्याचा डाव होता”

देवेंद्र फडणवीसांचा आणखी एक पेन ड्राईव्ह बाॅम्ब, म्हणाले…

  “दोन हात करायची वेळ आली तर आम्ही देखील कमी पडणार नाही”

  पुतिन यांना सर्वात मोठा झटका; युद्धामुळे लेकीचा…