LOCKDOWN- 4 : पाहा कसा असेल महाराष्ट्रातलं चौथं लॉकडाऊन…

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जवळपास गेल्या दोन महिन्यांपासून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा चौथा टप्पा 18 मे पासून सुरु होत आहे. लॉकडाऊनच्या पहिल्या तीन टप्प्यांहून हा चौथा टप्पा वेगळा असणार आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच त्यांच्या संबोधनात जाहीर केलं होतं. ज्यानंतर आता महाराष्ट्रात या चौथ्या टप्प्यात नेमकं कसं चित्र असेल हे समोर येत आहे.

राज्यात चौथं लॉकडाऊन कदाचित रेड झोन परिसरात वाढण्याची शक्यता अधिक आहे. मात्र, राज्य सरकार ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये सध्या पेक्षा अजून शिथिलता आणण्याच्या विचारात आहे, अशी माहिती समोर आली आहे.

राज्यात अनेक जिल्हे आणि गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळलेले नाहीत. त्यामुळे या भागांमध्ये बऱ्याच अंशी लॉकडाऊनला शिथिलता दिली जाऊ शकते, अशी देखील माहिती कळती आहे. लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोन तयार करून अटी शिथील करण्यात आल्या होत्या. आता चौथ्या टप्प्यातील लॉकडाउनमध्येही राज्यात मोठे बदल होण्याची चिन्ह आहे.

रेड झोनचा जिल्हा असला तरीही अशा ठिकाणी कंटेन्मेंट झोन वगळता इतर सर्व भागांमद्ये व्यवसाय आणि उद्योग पूर्णपणे सुरु रहावेत, यासाठी आरोग्यमंत्री टोपे आग्रही आहेत. रेड झोनमध्ये सर्वसामान्य नागरिकांना इतरत्र वावरण्याची मुभा मिळणार नाही. कोणीही उठावं कुठेही फिरावं, असं बेजबाबदार वर्तन अजिबात खपवून घेतलं जाणार नसल्याचा इशारा टोपे यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-गुजरातमध्ये परप्रांतीय कामगारांचा पुन्हा उद्रेक; भरुचमध्ये पोलिसांवर दगडफेक

-कोणतीही परीक्षा न घेता मेडिकलच्या जवळपास 30 हजार जागा भरणार- राजेश टोपे

-मोदी सरकारकडून शेतकऱ्यांसाठी 11 महत्त्वाच्या घोषणा

-‘सरकारला जाग कधी येणार?’; KEM रुग्णालयाचा व्हिडीओ पोस्ट करत राम कदमांचा सरकारला सवाल

-महिलेच्या बाळंतपणात सुप्रिया सुळेंची मायेची ऊब, माहेरहून आईला आणण्यासाठी केली मदत