पुणे | पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या रेकॉर्डमध्ये बनावट नोंदी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बनावट नोंदी खऱ्या भासवून तब्बल ७१ कोटी ७८ लाखांचे गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार अनिल शिवाजीराव भोसले यांच्यासह ११ जणांविरोधात गुन्हा दाखल केल्याचं समोर आलं आहे.
शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजीराव भोसले सहकारी बँकेत अनिल भोसले व्यवस्थापकीय संचालक आहे. देशाची सर्वोच्च बँक असणाऱ्या रिझर्व बँकेने शिवाजीराव भोसले बँकेच्या २०१८- १९ च्या शिल्लक रकमेचा लेखा पडताळण्याचे आदेश दिले होते.
बँक लेखा जोखा अहवालात अनिल भोसले यांच्यासह ११ जणांनी फायद्यासाठी बँकेच्या रेकॉर्डमध्ये बनावट नोंदी केल्याचं समोर आलंय. बनावट नोंदी खऱ्या भासवल्या आणि ७१ कोटी ७८ लाख रुपये लपवून ठेवल्याची बाब समोर आली. या प्रकरणी योगेश लकडे यांनी तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान, या गैरव्यवहार प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात माजी आमदार अनिल भोसले, शैलेश भोसले, तानाजी पडवळ, विष्णू जगताप आणि हनुमंत सोरते यांच्यासह ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
आता कोणत्याही गडावरुन कसलंच राजकारण नाही, तर विकास होईल- धनंजय मुंडे – https://t.co/xBCTEnq2RX @dhananjay_munde @BJP4Maharashtra @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) January 9, 2020
जिल्हा परिषदेतही ‘आम्हीच नंबर 1’; फडणवीसांनी सादर केली आकडेवारी! – https://t.co/ZI9Mhz0OsI @Dev_Fadnavis @OfficeofUT @BJP4Maharashtra @ShivSena
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) January 9, 2020
शेतकरी राजा संतापला! चुकीच्या भूसंपादनाविरोधात उद्या धडक मोर्चा – https://t.co/oZxbJJp2xd
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) January 9, 2020