‘करिश्माने माझ्याशी फक्त पैशासाठी लग्न केलं’; पतीच्या गंभीर आरोपानंतर करिश्माने…

मुंबई | बॉलिवूड मधील अनेक कलाकार हे त्यांच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींमुळे जास्त चर्चेत असतात. चाहत्यांना देखील आपल्या आवडत्या कलाकाराच्या आयुष्यात काय घडतंय हे जाणून घेण्याची इच्छा असते. बहुतेकदा आपल्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींमुळे चर्चेत राहणाऱ्या कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेत्री करिश्मा कपूर.

करिश्मा कपूर हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील यशस्वी अभिनेत्रींपैकी एक नाव आहे. करिश्माने आजवर अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. यामुळे तिचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. परंतु करिश्माचे करिअर जेवढे यशस्वी दिसत आहे तितकाच तिच्या आयुष्याचा प्रवास खडतर राहिला आहे.

करिश्माने संजय कपूर याच्याशी लग्न केलं होतं. या जोडप्याला लग्नानंतर दोन मुलं देखील झाली. परंतु काही काळाने या दोघांच्या नात्यात दुरावा आला. यानंतर करिश्माच्या पतीने तिच्यावर अनेक गंभीर आरोप केले. करिश्माने आपल्याशी फक्त पैशासाठी लग्न केलं असल्याचं संजय कपूर याने म्हटलं.

करिश्मा आणि संजयचं नातं खूप सुरळीत चाललं होतं. या जोडप्याला समायरा आणि कियान ही दोन मुलं देखील झाली. करिश्माचं चौकोनी कुटुंब पूर्ण झाल्याचं वाटू लागलं असतानाच लग्नानंतर 11 वर्षाने या दोघांच्या नात्यात दुरावा येण्यास सुरुवात झाली.

संजयची वागणूक या दोघांना एकमेकांपासून दूर घेऊन चालली होती. काही काळाने या दोघांतील वाद इतका विकोपाला गेला की 2012 पासून हे दोघे एकमेकांपासून दूर राहावू लागले. यानंतर वांद्रे कौटुंबिक न्यायालयात संजयने घटस्फोटासाठी याचिका दाखल केली.

या याचिकेत संजयने करिश्मावर अनेक गंभीर आरोप केले. संजय करिश्मावर आरोप करताना म्हणाला की, एक सून म्हणून करिश्माने केव्हाच आपल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या नाहीत. करिश्माने फक्त पैशासाठी माझ्याशी लग्न केलं आहे.

तसेच तिने माझ्या पैशाचा आणि संपत्तीचा वापर फक्त ऐश करण्यासाठी आणि चैनीच्या वस्तूंसाठी केला. तिने कुटुंबापेक्षा आपल्या करिअरला जास्त महत्व दिलं, असे गंभीर आरोप संजयने केले होते. यानंतर करिश्माने देखील पतीपासून घटस्फोटघेणं पसंत केलं.

महत्वाच्या बातम्या-

भर कार्यक्रमात मिका सिंगने राखीसोबतच्या नात्याबद्दल केला खुलासा!

सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण, वाचा आजचे दर

वाह रे पठ्ठ्या! पोलिसांनी गाडी उचलून नेल्यानं पुणेकरानं थेट बांधलं स्कूटीचं स्मारक

आजीने आजोबांना केलं किस; आजोबांनी जी प्रतिक्रिया दिली ती पाहून तुम्हालाही बसेल धक्का, पाहा व्हिडीओ

एका ग्लासामुळे नवरदेवाचं आलं खरं रूप समोर, पाहा व्हिडीओ