नवी दिल्ली | कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचंच दिसून येत आहे. त्यामुळे प्रसिद्ध लेखक चेतन भगतने सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
लॉकडाउन हा श्रीमंतांचा खेळ आहे. श्रीमंत व्यक्ती जर आजारी पडला तो सुट्टी घेऊन महिनाभर घरी बसू शकतो. मात्र गरीबांकडे हा पर्याय नाहीये. तसंच श्रीमंत देश बराच काळ लॉकडाउन घोषित करु शकतात मात्र गरीब देशाकडे तो पर्याय नाही, असं ट्विट चेतन भगतने केलं आहे.
चेतन भगतच्या या ट्विटची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. चेतन भगत बऱ्याच वेळा समाजात घडणाऱ्या घटनांवर व्यक्त होत असतो. सध्या लॉकडाउनचा तिसरा टप्पा सुरु असून उद्यापासून लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरु होणार आहे
लॉकडाउन 4.0 मध्ये निर्बंध शिथील करण्याबरोबरच आर्थिक घडामोडींना जास्तीत जास्त चालना देण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. तसंच उत्पादन कारखाने सुरु करण्याबरोबरच देशांतर्गत मर्यादित मार्गावर हवाई सेवा सुरु होऊ शकते, असं म्हटलं जात आहे.
लॉक्डाउन अमीरों का खेल है।
अमीर आदमी बीमार हो तो छुट्टी ले कर महीना घर बैठ सकता है। गरीब के पास वो विकल्प नहीं है।
ठीक उसी तरह अमीर देश लम्बा लाक्डाउन कर सकते हैं। गरीब देश के पास वो विकल्प नहीं है।— Chetan Bhagat (@chetan_bhagat) May 16, 2020
महत्वाच्या बातम्या-
-“आम्ही मोदींसारखे ड्रामेबाज नाही, जेव्हा मत हवं असतं तेव्हा ते मजुरांचे पाय धुतात”
-केंद्राने जाहीर केलेले पॅकेज म्हणजे ‘खोदा पहाड, निकला जुमला’; अशोक चव्हाणांची सडकून टीका
-उद्धवा अजब तुझे सरकार, गजब तुझा कारभार; सोमय्यांचा पुन्हा राज्य सरकारवर निशाणा
-सिलेंडर संपल्याने अंध दाम्पत्याची उपासमार; पोलिसांनी दिला मदतीचा हात
-अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचा ‘तो’ दावा खोटा- अनिल देशमुख