अनाजीपंतानं उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंमध्ये फूट पाडली- छगन भुजबळ

पुणे : छत्रपती संभाजी महाराजांच्या मालिकेचा संदर्भ घेत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. अनाजीपंतानं छत्रपती उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यात फूट पाडली, असं ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेला जुन्नरमधील किल्ले शिवनेरीवरुन सुरुवात झाली. यावेळी झालेल्या सभेत बोलताना छगन भुजबळ यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

कर्जमाफी योजनेस या सरकारनं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलं. मात्र आज जर महाराज असते तर या सरकारचा कडेलोट केला असता, असं छगन भुजबळ म्हणाले.

मोदी म्हणतात सबका साथ, सबका विकास, मात्र अरे ईव्हीएमवर विश्वास नाही त्याचं काय?, असा सवाल त्यांनी यावेळी विचारला. तसेच ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसला यावेळी त्यांनी चाफ्याची उपमा दिली. सध्या हा चाफा झडला असला तरी तो फुलल्याशिवाय राहणार नाही, असं ते म्हणाले.

छगन भुजबळ यांनी यावेळी शेरोशायरी देखील केली.

रडायला नाय लढायला शिका राव, असा सल्ला त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला. यासाठी त्यांनी शिवरायांचा, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण दिलं.

महत्वाच्या बातम्या-

-कलम 370च्या निर्णयानंतर आता बेळगाव महाराष्ट्राला द्या- नितेश राणे

-अमित शहा भडकले; म्हणाले…त्यासाठी जीवही देऊ

-संभाजी ब्रिगेड आता ‘राष्ट्रवादी काँग्रेस’चं काम करणार!

-शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन राष्ट्रवादीच्या ‘शिवस्वराज्य यात्रे’स सुरुवात

-“सचिन पायलट किंवा ज्योतिरादित्यांना काँग्रेसचे अध्यक्ष करा”