‘एकदा तरी चर्चा करायला हवी होती’, राऊतांच्या वक्तव्यावर छगन भुजबळांची नाराजी?

मुंबई  | एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीने महाविकास आघाडीच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली. एकनाथ शिदेंनी आमच्याकडे बहुमत असल्याचा दावा केल्याने महाविकास आघाडी सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना भावनिक साद घालूनही शिवसेनेची गळती कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. आमदार मोठ्या संख्येने शिंदे गटात जात असल्याने शिवसेनेचं टेंशन वाढलं आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना बंडखोर आमदारांना परत यायचं आवाहन केलं आहे. 24 तासांत मुंबईत परत या. समोर येऊन उद्धव ठाकरेंशी चर्चा करा. शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार आहे, असं मोठं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं.

संजय राऊतांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी व काँग्रेसमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. दोन्ही पक्षांमध्ये बैठकीचा सिलसिला सुरू झाला असून आता नाराजीच्या चर्चांना उधाण आलं आहे.

संजय राऊतांच्या वक्तव्यावर आता काँग्रेस नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे वक्तव्य करण्यापूर्वी एकदा घटक पक्षांशी चर्चा करायला पाहिजे होती, असं वक्तव्य भुजबळ यांनी केलं आहे.

छगन भुजबळांच्या या वक्तव्यात नाराजी साफ दिसत असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘आता माघारी जाण्याचा प्रश्नच नाही’, राऊतांच्या आवाहनाला एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर

राज्यातील सरकारबाबत नाशिकच्या अनिकेत शास्त्री यांचा सर्वात मोठा दावा, म्हणाले…

‘शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार फक्त…’, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

सूरतमधून निसटून आलेल्या कैलास पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट!

गुवाहाटीत एकनाथ शिंदेंचं जोरदार शक्तिप्रदर्शन; वर्षावर आता ‘इतकेच’ आमदार उरले