अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असलेल्या महाराजांचा पुतळा रोतोरात हटवला; शिवभक्त संतापले

कोल्हापूर | अवघ्या महाराष्टाचं दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रात्रात हटवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवण्यात आला आहे. त्यामुळे शिवभक्तांचा संताप अनावर झाला आहे.

मनगुत्ती येथील नागरिक यासाठी रस्त्यावर उतरले होते. तेव्हा कुठे पोलिसांचा दबाब कमी झाला होता. मनगुत्ती ग्रामपंचायतीच्या परवानगीनं शिवाजी महाराजांच्या पुतळा बसवण्यात आला आहे. मात्र, आता हाच पुतळा कर्नाटक सरकारनं हटवला आहे.

सरकारच्या आदेशानंतर रातोरात पोलीस बंदोबस्तात शिवरायांचा पुतळा हटवण्यात आला आहे. या घटनेनंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील शिवभक्तांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. कोरोनाच्या काळात कोरोनाचा संसर्ग कमी करण्यावर भर द्यायचा तर महाराजांचा पुतळा हटवून कर्नाटक सरकारने काय साध्य केलं.

दरम्यान, कर्नाटकच्या सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं वावडं आहे का?, असा सवाल उपस्थित होत आहे. मात्र या कृत्यामुळे शिवभक्त चांगलेच संतापले आहेत. उद्या म्हणजे 9 ऑगस्टला महाराष्ट्रातून शिवभक्त आंदोलन करण्यासाठी जाणार असल्याची माहिती आहे.

महत्वाच्या बातम्या-

पैसा कमावणं हा शिवसेनेचा एकमेव धंदा; नारायण राणेंची गंभीर टीका

धक्कादायक! सुशांतच्या एक्स मॅनेजरचा नग्नावस्थेत मिळाला होता मृतदेह

बाबा रामदेव यांना ‘कोरोनील’ पडलं महागात; हायकोर्टानं सुनावला तब्बल ‘इतक्या’ लाखाचा दंड!

सुशांतच्या डायरीतील ती पानं नक्की फाडली कोणी?, सुशांत आत्महत्या प्रकरणाला नवं वळण!

सुशांतच्या माझ्याजवळ संपत्ती म्हणून फक्त ‘या’ दोनच गोष्टी आहेत; अखेर रियाने केला खुलासा!