महाराष्ट्र मुंबई

…अखेेर NDRF च्या प्रयत्नांना यश; मुख्यमंत्र्यांनी केलं तोंडभरुन कौतुक

मुंबई : कोल्हापूरला जाणारी महालक्ष्मी एक्सप्रेस शुक्रवारी रात्रीपासून वांगनी जवळ आडकली आहे. त्यातील सर्व प्रवाशांना वाचवण्यात अखेेर NDRF च्या तुकड्यांना यश आलं आहे.  NDRF तुकड्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केलं आहे.

सर्वांना कळवण्यात आनंद होत महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये अडकलेल्या सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात NDRF च्या तुकड्यांना यश आलं आहे. NDRF तुकड्यांचे अभिनंदन, असं ट्वीट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे

एक्स्प्रेसमध्ये 700 प्रवासी अडकले होते. त्यात 9 गर्भवती महिलाही अडकल्या होत्या ज्यांची सुटका करण्यात NDRF च्या तुकड्यांना यश आलं आहे.

NDRF, नौदल, हवाई दल, पोलीस यांच्याबरोबरच स्थानिक नागरिकांच्या मदतीमुळं हे बचावकार्य अवघ्या दोन तासात पार पडलं आहे. रेल्वेबाहेर काढण्यात आलेल्या प्रवाशांना 14 बस गाड्या व तीन टेम्पोंच्या मदतीनं सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.

दरम्यान, प्रवाशांच्या जेवणाची आणि वैद्यकीय तपासणीची व्यवस्था करण्यात आली आहे. काही वेळातच त्यांना बदलापूरला नेण्यात येणार असून तेथून मनमाडमार्गे कोल्हापूरला पाठवले जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“पेशवाईची गिधाडं झडप घालण्याच्या तयारीत; आपण वेळीच त्यांना रोखू”

-“चित्रा वाघ यांनी पक्षात राहून पक्षाचं नुकसान केलं; आम्हीच हकालपट्टी करणार होतो”

-चित्रा वाघ आणि सचिन अहिर यांच्या राजीनाम्यावर मेहबूब शेख यांची आक्रमक प्रतिक्रिया!

-‘होय, मी शरद पवार साहेबांच्या सोबत आहे…; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची सोशल मीडियावर मोहीम

-या 20 दिग्गज नेत्यांनी पवारांची साथ सोडली तर हे 9 जण धक्का देण्याच्या तयारीत!

IMPIMP