‘शिवभोजनथाळी’बाबत मुख्यमंत्र्यांचा महत्वपूर्ण निर्णय

मुंबई | शिवसेनेने 2019 सालच्या विधानसभा निवडणुकांपूर्वी दहा रुपयांत पोटभर जेवण देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर राज्यात मोठे सत्तानाट्य होऊन महाविकास आघाडीची (MVA) स्थापना करण्यात आली.

त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने पुढाकार घेऊन 10 रुपयांत गरजू आणि गरिबांसाठी जेवण म्हणून शिवभोजन थाळीची सुरुवात केली. गेली तीन वर्षे ही सुविधा नागरिकांसाठी सुरु आहे.

पण राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे सांगत ही योजना बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाला सर्व स्तरांतून विरोध करण्यात आला. त्यामुळे आता त्यांनी याबाबत मोठा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शिवभोजन थाळी सुरुच राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

येथून पुढे या योजनेचा प्रत्येक जिल्ह्यातील पालकमंत्र्याकडून आढावा घेतला जाईल. आणि चौकशी नंतर योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanivis) यांनी सांगितले.

याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आणि तुर्तास ही योजना चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे नागरिकांना ही योजना उपभोगता येणार आहे.

महत्वाच्या बातम्या – 

न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर ‘कमळाबाई’ म्हणत भाजपची सामनातून केली पोलखोल

“…तोपर्यंत नरेंद्र मोदी मला संपवू शकत नाहीत”; पंकजा मुंडे यांचे पक्षाच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य

‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया विरोधात केंद्राचा मोठा निर्णय’; बेकायदेशीर ठरवत पुढील…

गिरीश महाजनांवर सीबीआयने गुन्हा दाखल केला! फडणवीस म्हणाले…

कोणत्या अधिकारात तुम्ही निवडणूक आयोगाकडे गेलात? न्यायालयाने शिंदे यांच्या वकिलाला फटकारले