Top news पुणे महाराष्ट्र राजकारण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली प्रकाश आमटेंची भेट, पाहा फोटो

Prakash Amte and Eknath Shinde 1
Photo Credit: Twitter @Eknath Shinde and

पुणे | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांनी नाशिक येथील मालेगावात मोठी सभा घेत तुफान भाषण केले. त्यानंतर ते काल  (दि. 02 ऑगस्ट) पुण्यनगरीत आले होते.

त्यांचा पुणे दौरा दोन कारणांमुळे गाजला. एक म्हणजे ते ज्या उद्यानाच्या उद्घाटनाला आले होते. त्या उद्यानाचे नाव मुख्यमंत्र्यांच्या नावे होते. विरोधकांनी कुचेष्टा आणि विरोध केल्याने त्यांनी ऐनवेळी तो समारंभ रद्द केला.

दुसरे महत्वाचे कारण म्हणजे त्यांच्या गटातील आमदार आणि महाविकास आघाडी सरकारचे शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर झालेला हल्ला. त्यामुळे काल दिवसभर पुण्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या.

ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे (Prakash Amte) यांच्यावर सध्या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात रक्ताच्या कर्करोगावर (Blood Cancer) उपचार सुरु आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची रुग्णालयात भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

पुण्यातील सर्व राजकीय कामे आटोपून त्यांनी रात्री उशिरा प्रकाश आमटे यांची भेट घेतली. या भेटीवेळी प्रकाश आमटे यांच्या पत्नी आणि समाजसेविका मंदाकिनी आमटे (Mandakini Amte) आणि त्यांचा पुत्र कौस्तुभ आमटे (Kaustubh Amte) आदी लोक उपस्थित होते.

पुण्याचे भाजप खासदार गिरिष बापट (Girish Bapat) आणि शिवसेना आमदार अनिल बाबर यांच्या पत्नी देखील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Dinanath Mangeshkar Hospital) दाखल आहेत. त्यांची देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी भेट घेत विचारपूस केली.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमवेत आमदार उदय सामंत, माजी आमदार विजय शिवतारे आणि आमटे कुटुंबीय उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या –

उदय सामंतांच्या गाडीवर हल्ला, नवा वाद पेटणार?

“कोरोना लसीकरण मोहीम संपल्यावर लगेच CAA लागू करणार…”

अजित पवारांनी उडवली शिंदे सरकारची खिल्ली, म्हणाले…

टीकेनंतर एकनाथ शिंदे उद्यानाच्या नावात बदल; आता ‘हे’ नाव देणार

‘त्या निर्णयांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करू नये’; शिंदेंची न्यायालयाला विनंती