मुंबई | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत ऐतिहासिक बंड केले. यावेळी त्यांना शिवसेनेच्या 40 आमदारांनी पाठिंबा दिला. भाजपचे त्यांच्यामागे अदृश्य हात होतेच. पण गेला महिनाभर मोठे सत्तानाट्य झाले.
त्यानंतर महिन्याभराने त्यांनी त्यांचा मंत्रिंडळ विस्तार केला. शिंदे सध्या सातारा जिल्ह्यात त्यांच्या मूळ गावी आहेत. तेथे त्यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे.
बंड केला त्यावेळी थोडाजरी दगाफटका झाला असता, तर शहिद होण्याचा धोका होता, असे शिंदे साताऱ्यात म्हणाले. यावेळी त्यांचे त्यांच्या मूळ गावी जंगी स्वागत झाले. लोकांच्या आणि देवीच्या आशिर्वादाने सगळे काही ठीक झाले, असे शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शिंदे प्रथमच आपल्या मूळ गावी दरे येथे गेले होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्या गावातील देवी पद्मावतीचे दर्शन घेतले आणि ग्रामस्थांसोबत संवाद साधला.
मंत्रिमंडळाचा विस्तार तर झाला पण आता खाचेवाटप केव्हा? यावर देखील शिंदे यांनी भाष्य केले. मला मंत्रिमंडळ विस्तार केव्हा होणार असे विचारले जात होते. ते झाले. आता खातेवाटप देखील होईल, असे शिंदे म्हणाले.
एक एक करत सगळ्या गोष्टी होतील, असे देखील शिंदे म्हणाले. कालच आम्ही महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानाची भरघोस मदत केली. एनडीआरएफच्या (NDRF) नियमाच्या दुप्पट नुकसान भरपाई आम्ही दिली, असे शिंदे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
दीपक केसरकरांचा बंडाबाबत खळबळजनक दावा, म्हणाले…
‘भाजपमध्ये आता फक्त फडणवीस एकटेच…’; भास्कर जाधवांची फडणवीसांवर टीका
‘बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान’
आरे कारशेडवरुन ठाकरे आणि फडणवीस यांची जुंपली; फडणवीस म्हणाले ‘ठाकरे आपल्या अहंकारा…’.
“जितेंद्र आव्हाडांना मानवाधिकार आयोगाची नोटीस”; काय आहे प्रकरण?