मुख्यमंत्री बलात्काऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत, संजय राठोडला तर चपलेने झोडायला पाहिजे- चित्रा वाघ

मुंबई | टिकटॉक स्टार पूजा चव्हाणच्या आत्महत्ये प्रकणात शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचे नाव जोडले जात आहे. त्यामुळे या मुद्द्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. त्याचबरोबर विरोधी पक्षातील नेतेही या प्रकरणावरुन सरकारवर टीकास्त्र सोडत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी संजय राठोड आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

बलात्कारी मंत्र्याला मुख्यमंत्री स्वत: च्या मांडीला मांडी लावून बसवून घेतात. याला तर चपलेनं झोडायला पाहिजे. जनतेच्या मनात त्याला स्थान राहिलयं का हे मुख्यमंत्र्यांनी पहावं. सगळा महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांकडे पाहतोय, मुख्यमंंत्री महोदय… असल्या बलात्काऱ्यांना हाकलून द्या, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

बलात्कारी नेते आणि मंत्र्यांना वाचवण्यासाठी सध्या राज्यात चढाओढ लागली आहे. याप्रकाराबद्दल वाईट वाटतं, अत्यंत चीड येेते. अरे तुम्हाला लोकीबाळा दिल्यात, अशाप्रकारे मुलींसोबत गलिच्छ प्रकार करणाऱ्यांना तुम्ही तिकडे बसवणार का? छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा जरासुद्धा तुम्हाला अधिकार नसल्याचंही चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

सगळे पुरावे असतानाही हे सरकार असं वागत आहे. त्यामुळे कर नाही त्याला डर कशाला?, असं मंत्र्यांना वाटत आहे. त्यांना वाटतं आमचे बाप बसलेत आम्हाला वाचवायला. पण लक्षात ठेवा खाली करायला आम्हाला वेळ लागणार नाही, असंही चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

जितक्यांचं वाटोळ केलंय तितक्यांची हाय तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही. या अशा प्रकारामुळे महाराष्ट्रातील जनता आपल्या मुली तसेच बायकांना राजकारणात पाठवण्याचा विचार देखील करणार नाही.

मुख्यमंत्री महोदय माझी हात जोडून विनंती आहे की तुमच्या कार्यकाळात तरी असं होऊ देऊ नका, असं आवाहनही चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलं आहे.

दरम्यान, संजय राठोड यांच्या समर्थनासाठी पोहरादेवीमध्ये झालेल्या गर्दीविषयी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांना विचारण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे गर्दी जमवून केलेले शक्तीप्रदर्शन आयोग्य होते, असं त्यांनी म्हटलं. विनायक राऊत यांनी आज रत्नागिरीमध्ये टिव्ही 9 शी संवाद साधला.

तसेच या प्रकरणी चौकशी पूर्ण झाल्यावर दोषींवर कारवाई होईल, असं रोखठोक वक्तव्य देखील विनायक राऊत यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘या’ अभिनेत्रीचा ग्लॅमरस अंदाज पाहूण चाहते घायाळ, पाहा फोटो

‘मी मर्द आहे असं पुन्हा केव्हा म्हणू नका’; निलेश राणेंची मुख्यमंत्र्यांवर बोचरी टिका

मोठी बातमी! ‘या’ कारणाने महाविकास आघाडीत शिवसेनेची कोंडी

‘या’ बड्या अभिनेत्रीचं ठरलेलं लग्न मोडलं, कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल!

राठोड यांच्यावर कारवाई होणार? शिवसेना खासदाराचं रोखठोक विधान