मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा आहेत की देवेंद्र फडणवीस, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला. कर्नाटकातील पूरस्थितीची पाहणी करता करता, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली. मात्र त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नव्हते. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा होते, त्यावर काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला आहे.
पूरग्रस्त महाराष्ट्राला मदत देण्याबाबत केंद्र सरकारतर्फे पूर्णपणे अनास्था दिसत असून अद्याप राज्याला कोणतीही मदत दिली नाही. विरोधी पक्षांच्या रेटयामुळे नाइलाजाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कर्नाटकचा हवाई दौरा केल्याचं थोरात म्हणाले.
अमित शहा कर्नाकच्या हवाई दौऱ्यावर असताना कोल्हापूर, सांगलीच्या पुराचेही हवाई पर्यटन केले. परंतु महाराष्ट्रातल्या पूरस्थितीची पाहणी अमित शाह यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्यासोबत केली असल्याचंही थोरात म्हणाले.
महत्त्वाचे केंद्रीय मंत्री नैसर्गिक आपत्तीची पाहणी करताना त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री किंवा अन्य एकही मंत्री नसावा, हे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले आहे, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.
दादर येथील टिळक भवन येथे मंगळवारी राज्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत पूरस्थितीबाबत चर्चा करण्यात आली.
दरम्यान, राज्य आणि केंद्र सरकारने पूरस्थितीकडे गांभीर्याने पाहिले नाही म्हणून ही स्थिती अधिक बिकट झाली आहे, असं म्हणत बाळासाहेब थोरातांनी राज्य आणि केंद्र सरकारला जबाबदार धरलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-टी-20 विश्वचषकात दिव्यांगांनी मिळवून दिलं भारताला विश्वविजेतेपद
-प्रकाश आंबेडकर विधानसभा निवडणूक ‘या’ चिन्हावर लढणार!
-1998 नंतर राष्ट्रकुल स्पर्धेत पहिल्यांदाच खेळले जाणार क्रिकेट; आयसीसीची घोषणा
-…म्हणून ग्रामीण भागात 10 हजार तर शहरात 15 हजार रुपयांची मदत करणार- मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
-पूरग्रस्त आणखी सावरले नाहीत अन् भाजप म्हणतंय मुख्यमंत्र्यांना राख्या पाठवा!