Goa Election Result 2022 | मुख्यमंत्री प्रमोद सावंत हरता-हरता जिंकले

पणजी | गोवा विधानसभा निवडणुकीत (Goa Elections Result 2022) अनेक ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळत आहेत. भाजप आणि काँग्रेसमध्ये सुरुवातीपासूनच कांटे की टक्कर होती.

पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी भाजप उत्सुक आहे, मात्र काँग्रेसही कडवी झुंज देताना दिसत आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) विजयी झाले आहेत.

साखळी मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार धर्मेश सगलानी यांना सावंतांनी पराभवाची धूळ चारली. मात्र विजय मिळवताना त्यांची पुरती दमछाक झाली. तर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पराभवाचा धक्का बसला आहे.

केपेमध्ये बाबू उर्फ चंद्रकांत कवळेकर पराभूत झाले आहेत. तर मडगाव मतदारसंघातून बाबू उर्फ मनोहर आजगावकरही चारी मुंड्या चित झाले आहेत. विशेष म्हणजे दोघंही उपमुख्यमंत्री पक्षांतर करुन भाजपत आले होते.

महत्त्वाच्या बातम्या – 

नोटापेक्षाही कमी मतं मिळालेल्या शिवसेना अन् राष्ट्रवादीला भाजपने डिवचलं! 

पंजाबने राखला आम आदमीचा ‘मान’; झाडूकडून काँग्रेसचा सुपडा साफ 

‘योगी पुढं जाणार हे नक्की होतं पण…’; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य 

 Election Results 2022 | शिवसेनेला मोठा धक्का! एकाही जागेवर उमेदवार आघाडीवर नाही

“आमचं राजकारण नकलांवर नाही तर कामावर, संघर्षावर उभं”