मुंबई | मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी असल्याच्या चर्चा सुरू आहेत. काँग्रेस (Congress) आमदारांनी नाराजी देखील व्यक्त केली होती. हे प्रकरण सोनिया गांधींपर्यंत देखील पोहचलं आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील या प्रकरणावर भाष्य केलं होतं. त्यामुळे काँग्रेसमधील नाराजी उघड होती. अशातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गृहमंत्रालयावर नाराज असल्याची चर्चा सुरू होती.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. त्यावरून आता राजकीय वर्तुळात अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
गृहमंत्र्यांना यावर प्रश्न विचारला असता, मुख्यमंत्र्यांना भेटून प्रशासकीय कामाबद्दल चर्चा केली, अशा प्रकारची कोणतीही नाराजी नसल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले आहेत.
गृहविभागावर मुख्यमंत्री नाराज नाहीत, त्यांनी स्वत: त्याबद्दल खुलासा केल्याचं देखील वळसे पाटलांनी सांगितलं आहे.
सगळ्यांना विश्वासात घेऊन काम करणार असून जर गृहखात्याकडून काही कमतरता असेल तर त्यावर सुधारणा केली जाईल, असं आश्वासन देखील गृहमंत्र्यांनी दिलं आहे.
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाराजी बोलूनही दाखवली होती, त्यामुळे आता येत्या काही दिवसात गृहविभाव अॅक्शन मोडवर असल्याचं पहायला मिळू शकतंय.
महत्त्वाच्या बातम्या-
Video | गर्लफ्रेंड-बाॅयफ्रेंडचा भररस्त्यात राडा; डिलिव्हरी बॉय सोडवायला गेला अन् भलतंच घडलं…
“गृहखात्यानं कठोर पावलं उचलावी अन्यथा…”
फक्त परीक्षेसाठी अभ्यास करू नका, स्वत:चा विकासही त्यातून करा- नरेंद्र मोदी
“अच्छे दिन हे एप्रिल फुलच, गेल्या 7 वर्षापासून लोक 15 लाख रुपयांची वाट बघतायेत”
“रेल्वेत होणारा पाकिटमारीचा तपास ईडी, सीबीआयकडून व्हायचा बाकी”