औरंगाबाद | रोज स्वप्नात उद्या सरकार पडणार असं येतं आणि सरकार पडल्यावर मीच पुन्हा येणार. मात्र
सरकारला अडीच वर्ष झाली. प्रशासनाचा काडीचा अनुभव नसलेला व्यक्ती मुख्यमंत्री, महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने नेतोय, असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीवासांवर निशाणा साधला आहे.
एक जमाना होता की देशाच्या कानाकोपर्यात शिवसेना-भाजप राजकारणात अस्पृश्य होतो, कारण हिंदुत्ववादी. 25-30 वर्षे तुम्हीं आमचा उपयोग करुन घेतला आणि सत्ता आल्यावर शिवसेना खुपायला लागली?, अशी टीका त्यांनी भाजपवर केलीये.
25 वर्षे मांडीवर होते, ते आता उरावर बसले आहे. जे मित्र होते ते आता हाडवैरी झाले आणि वैरी होते ते मित्र झाले. 25 वर्षे जे वैरी होते त्यांनी आम्हाला मानसन्मान दिला, असंही त्यांनी सांगितलं.
आमचे हिंदुत्व मोजणारे तुम्ही कोण, तुम्हाला कोणी मोजपट्टी दिली, असं आम्ही काय केलंय की आम्ही हिंदुत्व सोडलंय असं बोंबलत सुटलाय. शिवसेनेने हिंदुत्वासाठी आजपर्यंत काय केलंय आणि भाजपने काय केलंय एकदा खुल्या मंचावर होऊन जाऊ द्या, असं आव्हानच उद्धव ठाकरेंनी भाजपला दिला आहे.
भाजपने त्यांच्या बेलगाम सुटलेल्या प्रवक्त्यांच्या डोक्यात जर मेंदू असेल तर त्यात अक्कल घालावी, जर आमच्यावर वेडीवाकडी टीका केली, जर आमचा संयम तुटला तर तुमच्याच भाषेत तुम्हाला उत्तर मिळणार, असंही ते म्हणालेत.
महत्त्वाच्या बातम्या-
हिंदुत्व हा आमचा श्वास, हिंदुत्व हे आमच्या धमन्यांमध्ये आहे- उद्धव ठाकरे
“मराठवाड्यात शिवसेनेला आव्हान देणारी औलाद अजून जन्माला यायचीये”
“किरीट सोमय्यांनी परत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली तर थोबाड लाल करू”