“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आता निर्णय घ्यायला शिकावं”

पुणे| कोरोना महामारने सध्या सगळीकडे थैमान घातलं आहे. राज्य सरकार मोठ्या हिमतीने काम करत आहे. मात्र कोरोनाच्या आकड्यात गफलत असल्याचे आरोप विरोधक करत आहेत. अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी निर्णय घ्यायला शिका, असा सल्ला दिला आहे. ते काल पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात राज्य सरकार जबाबदारीपूर्वक कोणतेही निर्णय घेताना दिसत नाही. सर्व निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयावर सोडले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माझं एवढंच म्हणणं आहे की निर्णय घ्यायला शिका,जातीचा नेता होऊ शकतो, धर्माचा नेता होऊ शकतो पण आता उद्धव ठाकरे यांनी राज्याचा नेता व्हावं, असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.

इतर देशात जो लॉकडाऊन सुरू आहे त्याची कॉपी आपण करतो की काय अशी शंका येतेय. सरकारकडून अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी कुठलेही प्रयत्न केले जात नसल्याचं प्रकाश आंबेडरांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कोरोना काळात पंतप्रधान कार्यालयापासून ते जिल्हा पातळीवर अशा सर्वत्र चालढकल करणे सुरू आहे. कोरोना संकटात राज्य सरकारने एक वेळापत्रक ठरवून द्यावं की, या दिवशी सर्व व्यवहार सुरू होतील, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

चीनला झटका, भारतानंतर अमेरिकेत टिकटॉकवर बंदी घालणाऱ्या आदेशावर ट्रम्प यांची स्वाक्षरी

काही विघ्नसंतोषी राजकारण्यांच्या पोटदुखीस अंत नाही- संजय राऊत

महानायक अमिताभ यांनी लेखकाची मागितली माफी; मी चुकलो..

कोरोनामुळे सर्व मंडळांनी यावर्षी देखावे आणि मिरवणुक टाळाव्यात; पुण्याच्या महापौरांचं आवाहन

“राज्य सरकारने मुंबईकरांना प्रत्येकी 10 हजारांची मदत करावी, पाणी येण्याआधी नालेसफाई केली की हातसफाई?”