…तर भाजपने मला कधी ओळखलंच नाही- मुख्यमंत्री

मुंबई | मी इतक्या टोकाचा निर्णय घेईन, असं भाजपला वाटलं नसेल तर त्यांनी मला कधी ओळखलंच नाही, अस टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला आहे.

मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी समसमान पद्धतीने वाटून घेण्याचं ठरलं असतानाही भाजपने वचन मोडलं. इतकंच नाही तर मला खोटं ठरवण्याचा प्रयत्न केल्यामुळेच मी इतक्या टोकाचा निर्णय घेऊन महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

मी मुख्यमंत्री होईन असं कधी मला वाटलंच नाही. भाजपसोबत आमचे जुने ऋणानुबंध होते. 2014मध्ये त्यांनी विधानसभा निवडणुकीत युती तोडली असली तरी नंतर राज्य सरकारमध्ये पुन्हा एकत्र आलो होतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, निवृत्त होण्याच्या वयात मला नोकरी लागली, असा विनोद देखील उद्धव ठाकरे यांनी केला.

महत्वाच्या बतम्या- 

-महाराष्ट्राला इको-फ्रेण्डली दिशा पुणे देऊ शकते”

-शिवसेनेने प्रस्ताव दिला, तर सरकार स्थापनेसाठी भाजपकडून अडचण नाही- सुधीर मुनगंटीवार

-सरपंचाची थेट निवडणूक पद्धत रद्द; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

-“देशातील सर्व बॉम्बस्फोटांमध्ये आरएसएसचा हात आहे”

-सीएएविरोधात प्रस्ताव आणण्याचा कोणताही विचार नाही- अजित पवार