उद्धव ठाकरेंचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना दणका, उचललं ‘हे’ पाऊल

मुंबई | कोरोनाचा सामना करण्यास ठाकरे सरकार अपयशी ठरत असल्याची तक्रार देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांच्यासह भाजप नेत्यांनी थेट राज्यपाल भगतसिंग कोश्यारी Bhagatsingh Koshyari यांच्याकडे केली होती. त्यांच्या या तक्रारीनंतर राज्यपालांनी एका बैठकीचं आयोजन केलं होतं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना Uddhav Thackeray या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलं होतं, मात्र मुख्यमंत्र्यांनी या बैठकीला अनुपस्थिती दाखवली तसेच त्यांच्या सरकारमधील एकही मंत्री या बैठकीकडे फिरकला नाही. हा राज्यपालांना मुख्यमंत्र्यांनी दिलेला दणका मानला जात आहे.

भाजप नेत्यांच्या आरोपांनंतर राज्यपाल बैठक लावत असतील तर अशा राजकारणाला उद्धव ठाकरे यांनी सूचक उत्तर दिलं आहे. सोबतच त्यांनी आपले स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर Milind Narvekar यांना या बैठकीला पाठवून तेथील घडामोडींवर नजर देखील ठेवली.

दरम्यान, मुख्य सचिव अजोय मेहता, अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार, सीताराम कुंटे, मनोज सौनिक, नितीन करीर, प्रदीप व्यास, मुंबईचे महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यांना राज्यपालांनी काही सूचना केल्या.

महत्वाच्या बातम्या-

-“नरेंद्र मोदींमुळेच कोरोना भारतात आला, त्यांच्यावर 302 चा गुन्हा दाखल करा”

-कोरोनाचा महाराष्ट्राला मोठा धक्का; आवडता लोकगीत गायक हिरावला!

-निलेश राणे-रोहित पवार वादात जयंत पाटलांची उडी; रोहित पवारांना दिला हा सल्ला

-सर्व धार्मिक स्थळांचा पैसा गरिबांसाठी वापरावा; प्रकाश आंबेडकर यांची मागणी

-पुण्यात आज कोरोनाचे किती रुग्ण वाढले? किती रुग्णांना मिळाला डिस्चार्ज???