बारामतीत घुमणार मुख्यमंत्री फडणवीसांचा आवाज!

बारामती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला 1 ऑगस्टपासून सुरवात होत आहे. अमरावती जिल्ह्यातील मुझोरी या गावापासून या यात्रेला सुरवात होणार आहे.

मुख्यमंत्र्यांची ही महाजनादेश यात्रा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामतीतही जाऊन धडकणार आहे. 25 ऑगस्टला मुख्यमंत्री बारामतीत जाहीर सभा घेणार असून बारामतीत मुक्कामही करणार असल्याची माहिती मिळत आहे. 

बारामतीमध्ये सभा घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषदेचेही आयोजन करण्यात आलं असल्याचीही माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

‘अब की बार 220 पार’ या सूत्राला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रेचे आयोजन केले आहे. ही जनादेश यात्रा दोन टप्प्यात घेण्यात येणार आहे.

दुसऱ्या टप्प्यातील यात्रेच्या दौऱ्यात बारामतीचा समावेश करण्यात आला आहे. बारामतीतील रेल्वे ग्राऊंडवर संध्याकाळी मुख्यमंत्र्यांची सभा होणार असल्याची माहिती मिळत आहे. 

बारामतीतील सभा आणि पत्रकार परिषदेचा संदेश राज्य आणि देशभरात अधिक प्रभावीपणे जाण्यासाठी भाजप संघटनेकडून प्रयत्न सुरु आहेत. 

भाजपमध्ये राष्ट्रवादीसह अनेक पक्षातून आयारामांची संख्या जोरदार वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बारामतीतील सभेत काय बोलणार, याबाबत उत्सुकता आहे.

मुख्यमंत्र्यांसोबत भाजपचे अनेक मंत्री बारामतीत उपस्थित राहणार आहेत. बारामतीत भाजपने शक्तीप्रदर्शनाची जोरदार तयारी सुरु केली असल्याची माहिती मिळत आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-गिरीश महाजन देशातील मोठे नेते; संजय राऊतांनी मारला शालजोडीतून टोला

-राज ठाकरेंचं ‘मिशन विधानसभा’; या मुद्द्यावर घेणार ममता बॅनर्जींची भेट!

-पुण्यातील गहुंजे बलात्कारप्रकरणातील नराधमांची फाशीची शिक्षा रद्द; मरेपर्यंत जन्मठेप

-चहूकडून टीकेची झोड उठल्यानंतर ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी आझम खान यांचा माफीनामा!

-मनसेची ‘ही’ भूमिका आम्हाला मान्य नाही- शरद पवार