…म्हणून कोणत्याही चित्रात रामाच्या मुर्तीला मिशी नाही, संभाजी भिडे अज्ञानी; राम मंदिराचे पुजारी भडकले

अयोध्या | उद्या मुहूर्ताप्रमाणे राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. मात्र राम मंदिराच्या भूमिपूजनाती तारीख जाहीर झाली तेव्हापासून राजकीय वर्तुळात अनेक टीकाटिपण्णी झालेली पाहायला मिळाली. दरम्यान शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्यावर राम मंदिराच्या पुजारींनी आपली प्रतिक्रिया देताना त्यांच्यावर टीका केली आहे.

आतापर्यंतच्या फोटोंमध्ये राम-लक्ष्मणाला मिशा नव्हत्या. आतापर्यंत चुकीच्या पद्धतीने आपल्याला राम फोटोमध्ये दाखवले गेले. निदान अयोध्येमध्ये उभारल्या जाणाऱ्या रामाच्या मंदिराच्या मूर्तीमध्ये तर मिशा असाव्यात, असं संभाजी भिडे यांनी केली होती. भिडेंच्या या वक्तव्याचा महंत सत्येंद्र दास यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

संभाजी भिडे यांनी भलतीसलती वक्तव्य करू नयेत आणि कुठे जर रामाच्या मुर्तीला मिशा असतील तर त्या संभाजी भिंडेसारख्या अज्ञानी लोकांमुळे, असं म्हणत सत्येंद्र दास यांनी भिडे यांनी टीका केली आहे.

प्रभू राम, भगवान श्री कृष्ण आणि भगवान शिव हे हिंदू धर्मातील तीन प्रसिद्ध दैवत आहेत. या देवांना कधीही दाढी किंवा मिशी दाखवलेली नाही कारण या तिन्ही देवांना शोडवर्षीय दाखवण्यात आलं आहे.  शोडवर्षीय म्हणजे 16 वर्षीय देव, हे तिन्ही लोक जोपर्यंत पृथ्वीतलावावर असतील तोपर्यंत हे शोडवर्षीय राहणार असल्याचं सत्येंद्र दास यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

सुशांत सिंह प्रकरणवरून आरोप होत असलेल्या आरोपांवर अखेर आदित्य ठाकरेंनी सोडलं मौन; म्हणाले…

…तर अमृता फडणवीसांना राज्य सोडून जावं लागेल, हाच उपाय ; शिवसेना मंत्र्यांची फडणवीसांवर टीका

समुद्रात अडकले सुमारे 1 लाख मच्छीमार; प्रशासन अजूनही शांत

करिना नेपोटीजमवर बोलली अन् कंगनाची सटकली; अन् मग काय…

पावसाचे भयानक वास्तव! मुंबईमध्ये नाल्यात 2 घरे कोसळली, एका महिलेसह दोन मुली बेपत्ता