पालकांनो मुलांची काळजी घ्या! कोरोनाबाधीत मुलांना ‘या’ आजाराचा अधिक धोका

मुंबई | देशात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशात संशोधनातून चिंताजनक माहिती समोर आली आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या 18 वर्षांखालील लहान मुलांना मधुमेह आजार होण्याचा अधिक धोका असल्याचं सांगण्यात आलं आहे.

अमेरिकेच्या रोग नियंत्रण केंद्राच्या एका संशोधनात (CDC) असं उघड झालं आहे. इतकंच नाही तर कोरोना होऊन गेलेल्या लहान मुलांना मधुमेह होण्याचा धोका अडीच पटीने जास्त असल्याचं अभ्यासातून समोर आलं आहे.

युरोपमधील संशोधकांनी कोरोना महामारी सुरू झाल्यापासून टाईप एक मधुमेहाचे निदान झालेल्या मुलांची संख्या वाढल्याचं नोंदवलं आहे.

कोरोनामुक्त झालेल्या झालेल्या मुलांना टाईप एक किंवा टाईप दोन मधुमेह होण्याचा धोका लक्षणीयरीत्या वाढलेला दिसतो, असं अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या (CDC) संशोधकांनी शुक्रवारी सांगितलं.

या अभ्यासामध्ये 1 मार्च 2020 पासून सुरू होणार्‍या एका वर्षाच्या किंवा त्याहून अधिक कालावधीत 18 वर्षाखालील मुलांमध्ये झालेल्या मधुमेहाचे निदान पाहण्यासाठी यू.एस. आरोग्य योजनांतील दोन दाव्यांची माहिती वापरून ज्यांना कोविड आहे त्यांच्याशी तुलना केली गेली आहे.

दरम्यान, केवळ ओमिक्रॉनच (Omicron) नाही तर देशात कोरोनाचे रुग्णही वाढत आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात 27 हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळल्यानंतर आता कोविडच्या तिसऱ्या लाटेची (Corona Third Wave) भीती निर्माण झाली आहे.

इतकंच नाही तर तज्ज्ञांनी असंही म्हटलं आहे की, ज्यांना कोरोनाची लस मिळालेली नाही त्यांच्यासाठी ओमिक्रॉन त्रासदायक ठरू शकतो.

महत्वाच्या बातम्या-

मुकेश अंबानींनी न्यूयॉर्कमध्ये विकत घेतली नवीन मालमत्ता, किंमत ऐकून व्हाल थक्क 

ऐकून आश्चर्य वाटेल पण ‘या’ पठठ्याने एका बॉलमध्ये काढले चक्क 7 रन, पाहा व्हिडीओ 

एसटी बसचा चक्काचूर!, काळजाचा थरकाप उडवणारा अपघात 

बाहुबली फेम कट्टपालाही झाली कोरोनाची लागण, अभिनेते सत्यराज रूग्णालयात दाखल 

संसदेत कोरोनाचा उद्रेक, तब्बल ‘इतक्या’ जणांना कोरोनाची लागण