चक्क रस्त्यावर रंगली WWE! चिमुरड्यांच्या हाणामरीचा हा व्हिडीओ नक्की बघा, तुम्हीही पोट धरून हसाल

मुंबई | सोशल मीडियावर अनेक वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ आपलं मनोरंजन करून जातात तर काही व्हिडीओ आपल्याला एक चांगली शिकवन देवून जातात. सोशल मीडियावर लहान मुलांचे देखील काही मजेशीर व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात.

बहुतेकदा सोशल मीडियावर लहान मुलांच्या हाणामारीचे व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात. काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर दोन लहान मुलांच्या भांडणाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओतील ‘शंकरपाळ्या’ या शब्दाने सर्वांनाच पोट धरुन हसवलं होतं.

सध्या असाच एक लहान मुलांच्या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून जणू ही मुलांची WWE चालली आहे, असंच वाटत आहे. अनामिका अंबर नावाच्या युवतीने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.

या व्हिडीओवर कॅप्शन देत अनामिकाने लिहिलं आहे की, दोन मुलामुलांच्यात ल.ढाई चालली आहे. अशी देशी कुस्ती तुम्ही केव्हाच पाहिली नसेल. देशी कुस्ती चालू असतानाच सोबत विदेशी कॉमेंट्रीचा तडका देखील आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, चार पाच लहान लहान मुलं रस्त्यावर उभी आहेत. व्हिडीओमध्ये एका बाजूला सायकल पडलेली दिसत आहे. तसेच दुसऱ्या बाजूला दोन लहान मुलांची तुफान भांडणं चालली आहेत.

भांडणं करणाऱ्या मुलांच्या आजूबाजूला असणारी इतर मुलं भांडणं पाहून नाचत आहेत. यातील एक मुलगा तर ही भांडणं पाहून एवढा खुश झाला आहे की, तो तिथेच नाचत आहे. तसेच व्हिडीओमध्ये बॅकग्राऊंडला इंलिश कॉमेंट्रीचा आवाज देखील ऐकू येत आहे.

रस्त्याच्या कडेला उभं असणाऱ्या कोणीतरी ही संपूर्ण घटना आपल्या मोबाईलमध्ये कै.द केली आणि सोशल मिडियावर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. सध्या हा व्हिडीओ खूप वेगानं व्हायरल होत आहे. लोक यावर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

दरम्यान, व्हायरल होणारा हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे अद्याप समोर आलं नाही. मात्र, भांडण करणाऱ्या मुलांच्या बाजूला नाचणारा मुलगा आकर्षणाचं कारण ठरत आहे.

महत्वाच्या बातम्या – 

संतापलेल्या द्रविडचा अवतार पाहून विराटही हैराण, गाडीच्या काचा फोडल्या अन्…; पाहा व्हिडीओ

‘बिग बॉस’ फेम ‘या’ अभिनेत्रीनं कौटुंबिक वादातून केला आत्महत्येचा प्रयत्न

तरुणावर बिबट्याचा प्राणघातक हल्ला! हलक्या काळजाच्या लोकांनी…

जमीन खोदताना आवाज आला अन् शेतकरी मालामाल झाला; वाचा नेमकं काय आहे प्रकरण?

कर्माची फळं! मंदिरात चोरी करायला गेला अन् दानपेटीत हात अडकला मग…; पाहा व्हिडीओ