Top news देश

चिमुकलीचा ‘हा’ व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर तूफान व्हायरल, पाहा व्हिडीओ

Photo Credit- Instagram/kiara_minime

नवी दिल्ली | कोरोना काळापासून अनेकांनी घरबसल्या आपले छंद जोपासायला सुरूवात केली आहे. अनेक वर्षापासून धकाधकीच्या जीवनातून वेळ मिळत नसल्यामुळे काहींना स्वत:कडेही लक्ष द्यायला वेळ मिळत नसायचा. मात्र कोरोनाच्या काळापासून अनेकांनी आपल्या आवडीच्या गोष्टी करायला सुरूवात केली आहे.

त्याचप्रमाणे काहीजण आपले सोशल मीडियावर व्हिडीओही शेअर करत असतात. त्यामध्ये कधी गाण्याचे व्हिडीओ असतात, तर कधी डान्सचे. आता तर इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफोर्मवर रिल्सचा नवीन ट्रेंडचा निघाला आहे. रिल्स बनवण्याचं वेड बॉलिवडून स्टारपासून ते सर्वसामान्यांपर्यंत लागलं आहे.

कोणत्या गाण्यावर नाहीतर एखाद्या म्युझिंक वर रिल्स बनवत असतात. यामध्ये लहान मुलंही रिल्स बनवताना आपण पाहतो. अशातच एका चिमुकलीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये लहान मुलीने एक आईचा आणि तिच्या मुलीचा असे डबल रोल केला आहे. आई मुलीला म्हणते किती चॉकलेट खातीयेस? किती गोड खातेस मुंग्या लागतील तुला.

त्यावर मुलगी म्हणते म्हणजे?, त्यानंतर आई म्हणते चल उठं व्यायाम कर. मुलगी म्हणते आज नको, उद्यापासून नक्की करते. त्यानंतर दोन तासांनी त्या मुलीची आई व्यायाम करते आणि व्यायाम झाल्यावर एक लाडू खायला घेते. हे करत असताना ती मुलगी पाहते आणि तिच्या आईला म्हणते व्यायाम केल्यानंतर लाडू? हे ऐकल्यानंतर आई म्हणते ‘ओ नो’

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ ‘kiaraminime’ या यूजरने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी चिमुकलीचं कौतुक केलं आहे. विशेष म्हणजे तिने केलेला अभिनय पाहून सर्वांना आश्चर्य वाटतं आहे.

तसेच हा व्हिडीओ आतापर्यंत खूप लोकांनी लाईक केला असून, या व्हिडिओला अनेकांनी कमेंटही केल्या आहे. त्याचप्रमाणे हा व्हिडीओ बऱ्याच जणांनी शेअरही केला असल्याचं समजतं आहे.

महत्वाच्या बातम्या-

पोझ देता-देता महिलेचा अचानक घसरला पाय अन्…, पाहा व्हिडीओ

अचानक कार आली समोर अन्…; त्यानंतर जे झालं ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का, पाहा व्हिडीओ

गृहिणींनी बनवलं ‘या’ हिंदी गाण्याचं रिमेक, पाहा व्हायरल व्हिडीओ

न्यूड व्हिडीओमुळे चर्चेत आलेली ‘ही’ अभिनेत्री वयापेक्षा मोठं दिसण्यासाठी घ्यायची हार्मोनल इंजेक्शन्स!

दिल्लीत खलबतं सुरुच! शरद पवारांच्या उपस्थितीत विरोधकांची पुन्हा बैठक