मॉस्को | आज तंत्रज्ञानामुळे जग खूप जवळ आलं आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात घडलेली कोणतीही गोष्ट दुसऱ्या क्षणाला आपल्यापर्यंत पोहचते. जगभरात घडणाऱ्या अनेक वेगवेगळ्या गोष्टींचे व्हिडीओ देखील सतत सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात.
अशातच आता रशियातील एका पाच वर्षांच्या चिमुरड्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वजण ‘देव तारी त्याला कोण मारी’, असंच बोलत आहेत.
व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक पाच वर्षांचा चिमुरडा 12 व्या मजल्यावरून थेट जमिनीवर कोसळला आहे. मात्र, कोसळल्यानंतर देखील हा मुलगा स्वतः उठून बसला आहे. या मुलाच्या अंगाला खरचटलं देखील नाही.
इमारतीच्या शेजारीच असणाऱ्या सीसीटीव्हीमध्ये ही दुर्घटना कैद झाली आहे. यानंतर तेथील स्थानिक माध्यमांनी याविषयी वृत्त दिलं होतं. स्थानिक माध्यमांनी या घटनेविषयी वृत्त दिल्यानंतर सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मुलगा सोमवारी घरामध्ये एकटाच होता. यावेळी बाल्कनीमध्ये खेळत असताना तो अचानक खाली कोसळला. पण यावेळी खाली बर्फाची चादर पसरली होती. यामुळे या मुलाच्या अंगाला खरचटलं देखील नाही.
या मुलाला खाली कोसळलेलं पाहिल्यानंतर आसपासचे लोक तेथे आले. या मुलाला अंगाला काहीही दुखापत झाली नाही. मात्र त्याची प्रकृती गंभीर आहे. या मुलावर तीन शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. सध्या त्याची प्रकृती स्थीर आहे.
दरम्यान, या मुलाचं नशीब बलवत्तर असल्यामुळे त्याचे प्राण वाचले, असंच सर्वजण बोलत आहेत. इतक्या उंचीवरून पडून देखील स्वतः उठून उभा राहणाऱ्या पाच वर्षांच्या या चिमुरड्याचा व्हिडीओ तुम्ही देखील नक्की पाहा.
महत्वाच्या बातम्या –
वनअधिकारी दीपाली चव्हाण यांची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये केले धक्कादायक आरोप
“यूपीएचा विषय केंद्रातला, जिल्हास्तरावरील लोकांनी यावर…
‘बोल्ड सीन देण्यास माझा नकार नाही पण….’…