चीननं कसा केला भारताचा विश्वासघात?, भारतीय जवानांनी सांगितली इनसाईड स्टोरी

गलवान खोऱ्यात चीनी सैन्यासोबत झालेल्या हिंसक झडपेत भारताचे २० जवान शहीद झाले. बिहार रेजिमेंडचे कमांडिंग ऑफिसर कर्नल संतोष बाबू यांनाही वीरमरण आलं. या घटनेमुळं देशभरात तिव्र संतापाची लाट उसळली आहे.

war 3

गलवान खोऱ्यात ३० दिवसांपासून तणावाचं वातावरण कायम होतं. लडाख क्षेत्रात दोन्ही देशांकडून हा वाद कायमचाच पहायला मिळतो. दरम्यान सोमवारी रात्री सैनिकांची एक तुकडी भारताच्या भागात असलेला चीनी सैनिकांचा तंबू हटविण्यासाठी सरसावली.

army 1 e1592404485808

भारतीय सैन्य अधिकारी हरिंदर सिंग व चीनी सैन्य अधिकारी लिन लिऊ यांच्यात तंबू हटविण्याबाबत चर्चाही झाली होती. मात्र अचानक चीनी व भारतीय सैनिकांत दगड व काठीनं हिंसक झटापट झाली. जवळपास ३ तास चाललेल्या या घटनेचा एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून खुलासा करण्यात आला आहे.

war 2

भारतीय लष्कराकडून कर्नल संतोष बाबू यांच्या तुकडीला गलवान खोऱ्यातील तंबू हटविण्याचा आदेश देण्यात आला. दोन्ही देशांत हा तंबू हटविण्याबाबत एकमतही झालं होतं. कर्नल बाबू यांच्या तुकडीनं आदेशाप्रमाणे हा तंबू हटवला. मात्र अचानक पॅट्रोलिंग पाॅइंट १४ जवळ हिंसक झडप पहायला मिळाली.

war 6

चीनच्या सैनिकांकडून लोखंडी राॅड व दगडानं भारतीय सैनिकांवर हल्ला करण्यात आला. हत्यार नसलेल्या सैनिकांवरही हल्ला झाला. चीनच्या या हल्ल्याचं भारतीय सैनिकांकडूनही चोख प्रत्युतर देण्यात आलं. दोन्ही बाजूंच्या सैनिकांत यादरम्यान ३ तास धुमश्चक्री झाली.

war 8 e1592404870786

काही जवानांनी जीव वाचविण्यासाठी गलवान नदीत उड्या मारल्या. शून्य अंशापेक्षा कमी तापमान असलेल्या या भागात रक्त गोठवणारी थंडी असते. या प्रतिकूल परिस्थितीतही भारतीय जवानांनी चीनच्या सैनिकांना चोख प्रत्युत्तर दिलं. मात्र भारताच्या २० जवानांना या हिंसक घटनेत वीरमरण आलं. ११० जखमींवर अद्याप उपचार केला जात आहे.

china flaG

दरम्यान, चीनकडून झालेल्या कुरघोडीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग व लष्करप्रमुखांची तातडीनं बैठक पार पडली. या बैठकीला विदेश मंत्री एस. जयशंकर देखील उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडूनही सदर घटनेचा तिव्र शब्दात निषेध करण्यात आलाय. भारतीय सैनिकांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. भारताकडून चीनला अगदी चोख प्रत्युत्तर दिलं जाईल. असा रोखठोक इशाराच मोदींनी चीनला दिला आहे.

China

दोन्ही देशांत जवळपास ४५ वर्षांतून पहिल्यांदाच झडप झाली आहे. यापूर्वी १९७५ साली चीन भारताच्या समोर युद्धाला उभा ठाकला होता. दोन्ही देशांत सीमेवर शांतता प्रस्थापीत व्हावी यासाठी शांतता करारही झाला आहे. मात्र चीनकडून सीमाभागात कुरघोडी चालूच असल्याचं पहायला मिळतं.

महत्वाच्या बातम्या-

-सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीची चौकशी; रिया वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये दाखल

-सुशांतबाबत ती पोस्ट करणं करण जोहरला पडलं भारी; इतके लाख फॉलोअर्स झाले कमी

-“…अन् आपले राज्यकर्ते जग जिंकायला निघालेत, याचं आश्चर्य वाटतं”

-“मोदीजी…माझ्या पतीचं बलिदान व्यर्थ जायला नको, चीनी सैनिकांना ठार मारा”

-देशात कोरोनाचा हाहाकार, रूग्णसंख्येत आतापर्यंतची सगळ्यात मोठी वाढ