बिजिंग | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना व्हायरसला चिनी व्हायरस म्हटल्यानंतर चीनचा चांगलाच संताप झालाय. चीनच्या परदेश मंत्रालयाने ट्रम्प यांच्या विधानाचा निषेध करत कठोर शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. तसेच अशा प्रकारची वक्तव्य न करण्याचा इशारा अमेरिकेला दिला आहे.
चीनने द न्यू-यॉर्क टाइम्स, द वॉशिंगटन पोस्ट आणि ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ या अमेरिकेच्या तीन आघाडीच्या वृत्तपत्रांना बंद केलंय. डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना व्हायरसचा उल्लेख करताना त्याला चिनी व्हायरस म्हटले होते. त्यानंतर चीनकडून अमेरिकी माध्यमांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
चीनने या तिन्ही अमेरिकी वृत्तपत्राच्या पत्रकारांना देशातून हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये परदेशी माध्यमांवर चीनकडून झालेली ही सर्वात कठोर कारवाई आहे.
चिनी माध्यमांविरोधात अमेरिकेने केलेल्या कारवाईमुळे आम्ही त्यांच्या माध्यमांवर कारवाई केली असे चिनी परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. तर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पियो यांनी चीनला केलेल्या कारवाईवर विचार करण्याचं आवाहन केलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-…म्हणून रितेश देशमुख कोरोनाग्रस्त रुग्णावर संतापला
-राजभवनाच्या भिंतींना वाचाळ तोंड आहे हे मलिक यांनी उघड केलं- शिवसेना
-#corona | गर्दी टाळा नाहीतर…; मुख्यमंत्र्यांचा मुंबईकरांना इशारा
-कोरोनाचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचा अनोखा उपक्रम
-कोरोनाचा फटका राज ठाकरेंनाही; मेळावा करावा लागला रद्द