कोरोना संसर्गाबाबत चीनने केला मोठा खुलासा

चीनने कोरोनाची माहिती इतर देशांना कळविण्यास जाणून-बुजून उशीर केला असा आरोप विविध देश चीनवर करत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही कोरोनावरून चीनवर अनेकदा टीकेची तोफ डागली आहे. याच पार्श्वभूमीवर चीनने आता मोठा खुलासा केला आहे.

रविवारी चीनने कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर एक श्वेतपत्रिका काढली आहे. या श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून साथीची माहिती देण्यास उशिर केल्यासह चीनने इतर आरोप फेटाळून लावले आहेत. वुहान शहरात 27 डिसेंबरला सर्वप्रथम करोना विषाणू आढळला, तर त्याचा संसर्ग होत असल्याचे 19 जानेवारीला समोर आले, असं चीनने या श्वेतपत्रिकेत म्हटले आहे.

चीनने श्वेतपत्रिकेत लिहिल्यानुसार, “वुहानमधील रुग्णालयात 27 डिसेंबरला ‘कोरोना आजाराचे निदान झाले. स्थानिक सरकारने या रुग्णांचे विश्लेषण करण्यासाठी तज्ज्ञांना पाचारण केले. त्या वेळी ही व्हायरल न्युमोनियाची केस असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता.”

“चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या उच्चस्तरीय तज्ज्ञांच्या पथकाने या विषाणूचा संसर्ग मानवाकडून मानवात होत असल्याचा निष्कर्ष 19 जानेवारीला काढला. या नव्या आजाराबद्दल तज्ज्ञांनी इशारा दिल्यानंतर महिनाभराच्या आतच पथकानं हे काम केले, तसंच त्यानंतर काही तासांतच लोकांना त्याबद्दल माहिती देण्यात आली”.

महत्वाच्या बातम्या-

-बहिष्कार तर दूरच पण तुम्हाला चिनी वस्तूंशिवाय पर्यायच नाही, चीनने भारताला ललकारलं

-“आत्मनिर्भर भारतचे ढोल पिटायचे अन् दुसरीकडे चीनची बाजारपेठ खुली ठेवायची, त्यानेच अर्थव्यवस्था संपली”

-दहावी बारावीच्या निकालासंदर्भात राज्य मंडळाच्या अध्यक्षांचा मोठा खुलासा, पाहा कधी लागणार निकाल…

-“सैनिकांच्या हाती थाळ्या, चमचे, मेणबत्त्या नसून बंदुकाच आहेत हे चीनला दाखवून द्यायची हीच ती वेळ”

-“उद्धव ठाकरे लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले हेच फडणवीसांना खुपतंय”