Top news देश

‘या’ कारणामुळे शरद पवार चिंताग्रस्त; राष्ट्रवादीच्या खासदारांसह माजी अधिकाऱ्यांची बैठक

मुंबई | गलवान खोऱ्यात चिनी सैन्यानं केलेल्या घुसखोरीनानंतर भारत चीनमध्ये तणावाच वातावरण तयार झालं आहे. दोन्ही देशातील तणाव कमी करण्यासठी राजकीय तसेच तसेच सैन्य पातळीवर अनेक प्रयत्न करण्यात आले आहेत. मात्र, तरीही चिनी सैन्य भारतीय हद्दीत आपले पाय रोवून उभा आहे. चिनी सैन्याच्या वाढत्या हालचाली लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तसेच माजी संरक्षण मंत्री शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे.

चीनकडून भारतीय हद्दीत होणारी घुसखोरी हा चिंतेचा विषय बनला आहे. दक्षिण चीन समुद्रातही चीनच्या हालचाली वाढल्या आहेत. तसेच भारतीय उपखंडाला चारही दिशांनी वेढा देण्याचा चीनचा प्रयत्न असल्याचं दिसून येत आहे. सद्यस्थितीत श्रीलंका आणि नेपाळ मधील हालचालींवर गांभीर्यानं लक्ष ठेवण्याची गरज आहे, असं मत शरद पवार यांनी ट्वीटरवरून व्यक्त केलं आहे.

सध्या भारत चीनमध्ये प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. एकीकडे चीनचे अनेक अॅप्स बॅन करत भारत चीनवर डिजिटल स्ट्राईक करत असल्याचं दिसत आहे. तर दुसरीकडे चीन प्रत्यक्ष युद्ध तयारीला लागल्याचं दिसत आहे. भारत चीनमध्ये सध्या तयार झालेल्या याच तणावाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी बैठक घेतली आहे.

या बैठकीला शरद पवारांसह निवृत्त भारतीय हवाईदल प्रमुख भूषण गोखले, माजी पारराष्ट्र सचिव विजय गोखले, राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल आणि वंदना चव्हाण हे उपस्थित होते. भारत चीनमधील संबंधांवर या बैठकीमध्ये चर्चा झाली. तसेच गेल्या काही महिन्यांपासून भारत चीनमध्ये चाललेल्या सीमावादावर सर्वांनी आपली मतं मांडली. या बैठकीत भारत चीनचा इतिहास लक्षात घेत पुढे भारताला कोणती पाऊलं उचलावी लागतील यावरही चर्चा झाली आहे.

पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यावर असणाऱ्या परिसरात ताबा मिळवण्यासाठी चिनी लष्करानं पुन्हा एकदा प्रयत्न केला होता. मात्र, भारतीय सैन्यानं तातडीनं पाऊल उचलत चीनचा हा प्रयत्न हाणून पाडला आहे. चीन भारतीय भूभागावर ताबा मिळवण्यासाठी पुढेही अशा कुरघोड्या करू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, 15 जून रोजी भारत चीन सैन्यात गलवान खोऱ्यामध्ये संघर्ष झाला होता. तेव्हापासून भारत चीन संबंध चिंताजनक बनले आहेत. चीनच्या वाढत्या हालचाली रोखण्यासाठी भारत पुढे कोणती पाऊलं उचलतोय यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

आधी बेड मिळाला नाही, नंतर पार्थिवाची हेळसांड; पुण्याच्या माजी महापौराचा दुर्दैवी शेवट!

सुशांतसिंग प्रकरणात नवा ट्विस्ट; सुशांतच्या कुटुंबाच्या वकिलाचा नवा धक्कादायक दावा

सुशांत प्रकरणी मोठी बातमी! 13 दिवसांच्या तपासानंतर अखेर सीबीआयचा महत्वाचा निष्कर्ष

दहावी-बारावीच्या ATKT च्या परीक्षांबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला मोठा निर्णय

…अन्यथा उद्धव ठाकरेंनी काम करण्यासाठी आणखी एक मुख्यमंत्री ठेवावा- चंद्रकांत पाटील