“उदय शेट्टी आणि मजनू मध्ये संजय राऊतांचा घुंगरू शेठ झालाय”

मुंबई | नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर आरोपाचा फेऱ्या सुरू केल्यानंतर आता या प्रकरणात भाजपने नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

नवाब मलिक यांचा अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. फडणवीसांच्या या आरोपानंतर राजकारणात एकच खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.

तर दुसरीकडे संजय राऊत यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. सिल्वर ओकवर या दोन नेत्यांची भेट झाली. त्यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

दुसऱ्यांना उखडता–उखडता एक दिवस तुम्हीच मुळापासून उखडले जाणार नाहीत ना?, असा सवाल संजय राऊत यांनी सामना अग्रलेखाच्या माध्यमातून विचारला होता. त्यावर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी टीका केली आहे.

सर्वज्ञानी असलेले संजय राऊत नगरच्या आगीचं खापर पण केंद्रावर फोडत आहेत. व्हेंटिलेटर नव्हे तर राऊत यांची मानसिकताच निकृष्ट बनत चालली आहे, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.

आगीत होरपळलेल्यांची चिंता संजय राऊतांना नाही. उलट राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोघांची मर्जी संजय राऊतांना सांभाळावी लागत आहे, असंही चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

उदय शेट्टी आणि मजनू यांच्या मध्ये संजय राऊतांचा घुंगरू सेठ झालाय, अशी जहरी टीका देखील चित्रा वाघ यांनी केली आहे. त्याचसोबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील घणाघाती टीका केली आहे.

1993 बॅाम्ब ब्लास्ट प्रकरणामधील आरोपींच्या मित्रांशी मुख्यमंत्री मांडीला मांडी लावून बसले आहेत. सत्तेसाठी अंडरवर्ल्डची मदत घेणारे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद होईल, अशी टीका देखील चित्रा वाघ यांनी यावेळी केली आहे.

बॅाम्ब ब्लास्टमध्ये ज्या निष्पाप जीवांचे बळी गेले त्यांच्या कुटुंबीयांशी, महाराष्ट्राच्या जनतेशी आणि मराठी माणसाशी या ठाकरे सरकारे केलेला हा विश्वासघात आहे, असंही चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

देशवासियांच्या पाठीत महाविकास आघाडीकडून खंजीर खुपसला गेल्याचं देखील चित्रा वाघ यांनी बोलून दाखवलं. ‘महाविकास आघाडी का हाथ, अंडरवर्ल्ड के साथ’, अशी खोचक टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे.

महत्वाच्या बातम्या- 

“अनिल देशमुखांचा बळी दिला जातोय, राजा आणि वजीर पुढे येत नाहीत”

“नवाब मलिकांच्या विरोधातील सगळे पुरावे मी शरद पवारांना देणार”

 सोन्याच्या दरात मोठी घसरण; वाचा आजचे ताजे दर

  कर्णधारपद सोडल्यावर विराटची भावूक प्रतिक्रिया, म्हणाला…

  अभिनेत्री पूनम पांडेच्या पतीला पुन्हा मुंबई पोलिसांकडून अटक